Latest

INDvsSAODI : भारताकडून द. आफ्रिकेचा सुपडासाफ, तिस-या वनडेसह मालिका जिंकली

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शिखर धनच्या नेतृत्वाखाली खेळणा-या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्धची तिसरी वनडे 7 विकेट्सनी जिंकून तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. विजयासाठी आवश्यक असणारे अवघ्या 100 धावांचे लक्ष्य भारतीय फलंदाजांनी 19.1 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून पार केले. यात सलामीवीर शुबमन गिल याने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. पण अवघ्या एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. त्यामुळे चाहते नाराज झाल्याचे दिसले. भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. यापूर्वी 2010 मध्ये टीम इंडियाने शेवटची मालिका 2-1 ने जिंकली होती. त्याच वेळी, 2015 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-3 असा पराभव पत्करला होता.

तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी भेदक मारा करत द. आफ्रिकेचा संपूर्ण 27.1 षटकात अवघ्या 99 धावांत गुंडाळला. 35 धावा करणारा क्लासेन संघातील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याच्याशिवाय केवळ दोन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने शुभमन गिलच्या 49 धावांच्या जोरावर सात गडी राखून सामना जिंकला. भारताने 19.1 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. श्रेयस अय्यरने षटकार मारून सामना संपवला.

गिल-अय्यर यांच्यात उपयुक्त भागीदारी

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात उपयुक्त भागीदारी झाली. या दोघांनी मिळून 17 धावा जोडल्या असून 14 षटकांनंतर भारताची धावसंख्या 75 अशी आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताला फक्त 25 धावांची गरज आहे.

भारताची दुसरी विकेट

भारताला दुसरा धक्का 58 धावांच्या स्कोअरवर बसला. इशान किशन 10 धावा करून बाद झाला. फोर्टुइनने त्याला यष्टिरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले. 100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ विजयाच्य उंबरठ्यावर पोहचला आहे. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज आपल्या संघाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 11 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा होती.

भारताची पहिली विकेट पडली

भारताला पहिला धक्का 42 धावांवर बसला. कर्णधार शिखर धवन 14 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. शुभमन गिलसोबत झालेल्या गैरसमजामुळे तो धावबाद झाला. धवन बाद झाल्यानंतर इशान किशन शुभमन गिलला साथ देण्यासाठी मैदानात उतरला.

धवन गिलची शानदार फलंदाजी

100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि शिखर धवन या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघेही जबरदस्त लयीत दिसले. ते वेगाने धावा काढत होते. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 42 होती.

भारताची फलंदाजी सुरू

100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. शुभमन गिल आणि शिखर धवन क्रीजवर सलामीला आले. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने पहिले षटक टाकले. पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद सात धावा होती.

भारताविरुद्ध द. आफ्रिकेची 99 ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. द. आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक 34 धावा केल्या. त्यांच्याशिवाय येनेमन मलान (15 धावा) आणि मार्को जॅन्सन (14 धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

दक्षिण आफ्रिकेची नववी विकेट

कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेला नववा धक्का दिला.

दक्षिण आफ्रिकेचे आठ फलंदाज बाद

दक्षिण आफ्रिकेचे आठ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. कुलदीप यादवने फोर्टोइनला बाद करून दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का दिला.

दक्षिण आफ्रिकेचे सात फलंदाज बाद

शाहबाज अहमदने दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला आहे. त्याने हेनरिक क्लासेनला बोल्ड केले. क्लासेनने 42 चेंडूत 34 धावा केल्या.

द. आफ्रिकेला सहावा झटका

दक्षिण आफ्रिकेचे सहा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. फेहलुकवायोला बाद करून कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का दिला. पाच धावा करून तो बाद झाला. आता मार्को जॅनसेन हा हेन्रिक क्लासेनसोबत क्रीजवर आहे. 20 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 6 बाद 73 आहे.

दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत

वॉशिंग्टन सुंदरने दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. त्याने 18.5 व्या षटकात मिलरला क्लिन बोल्ड करून माघारी धाडले. टी 20 मध्ये हारताविरुद्ध शतक फटकावणारा मिलर आजच्या सामन्यात काही खास प्रदर्शन करू शकला नाही. तो 8 चेंडूत केवळ सात धावा करून बाद झाला. 19 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 5 बाद 67 अशी होती.

दक्षिण आफ्रिकेची चौथी विकेट

एडेन मार्करामच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का बसला. 19 चेंडूंत नऊ धावा करून तो बाद झाला. शाहबाज अहमदने त्याला यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन क्रीजवर आहेत. 16 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 4 बाद 44 होती.

सिराजने दिला द. आफ्रिकेला तिसरा धक्का

मोहम्मद सिराजने द. आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. त्याने रीझा हेंड्रिक्सला रवी बिश्नोई करवी झेलबाद केले. हेंड्रिक्सने २१ चेंडूंत केवळ ३ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ संघर्ष करताना दिसत आहे. १० षटकांनंतर पाहुण्या संघाची धावसंख्या ३ बाद २६ अशी होती.

द. आफ्रिकेला दुसरा झटका…

मोहम्मद सिराजने भारताला दुसरे यश मिळवून दिले. आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने मलानला बाद केले. मलानला २७ चेंडूत केवळ १५ धावा करता आल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. आवेश खानने मालनचा झेल पकडला. यानंतर एडन मार्कराम क्रीजवर आला. हेंड्रिक्स दुसऱ्या टोकाला आहे. दक्षिण आफ्रिकेने आठ षटकांत २ बाद २५ धावा केल्या आहेत.

भारताची सर्वोत्तम गोलंदाजी

आतापर्यंतच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. द. आफ्रिकेला सात षटकात एका विकेटवर केवळ २० धावांपर्यंत माजल मारली. रीझा हेंड्रिक्स नाबाद दोन तर येनेमन मालन ११ धावांवर नाबाद होते. भारताकडून आतापर्यंत वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांनी गोलंदाजी केली.

वॉशिंग्टन सुंदरला पहिले यश

वॉशिंग्टन सुंदरने भारताला पहिले यश मिळवून दिले. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने डावखुरा फलंदाज क्विंटन डी कॉकला बाद केले. डिकॉकने 10 चेंडूत सहा धावा केल्या आणि त्याला आवेश खानने झेलबाद केले. डिकॉक बाद झाल्यानंतर रीझा हेंड्रिक्स मैदानात आला. दुसऱ्या टोकाला मालन आहे.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्‍यर, संजू सॅमसन ( यष्‍टीरक्षक), वॉशिंग्‍टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्‍मद सिराज, आवेश खान

द. आफ्रिका संघ : डेव्‍हिड मिलर ( कर्णधार), क्‍विंटन डिकॉक ( यष्‍टीरक्षक), यानेमन मालन, रिजा हेंड्रिक्‍स, एडेन माक्रराम, हेनरिच क्‍लासेन, मार्को जॅन्‍सन, एंडिले फेहलुकवायो, ब्‍योर्न फोर्तूइन, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्त्जे


.IND vs SA 3rd ODI : आजचा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्‍वपूर्ण

२२ फ्रेबुवारी २०१० नंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्‍ध भारतात १० वनडे सामने खेळले आहेत. यातील केवळ चारमध्‍ये विजय मिळवला आहे. तर सहा सामन्‍यात पराभववाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्‍याच मायभूमीत मालिका जिंकण्‍याचे आव्‍हान टीम इंडियासमोर असेल. तब्‍बल १२ वर्षांनंतर भारतीय संघाला ही संधी मिळाली आहे. आजचा सामना दक्षिण अफ्रिकेसाठी खूपच महत्त्‍वपूर्ण आहे. आजच्या सामन्‍यात पराभव झाला तर वनडे विश्‍वचषकामध्‍ये पात्रतेसाठी खेळण्‍याची नामुष्की या संघावर ओढावणार आहे

SCROLL FOR NEXT