Latest

यवत : सामुहिक कॉपीत शिक्षकही सहभागी; ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

यवत(ता .दौंड); पुढारी वृत्तसेवा : केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात 12 वी च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याने स्थानिक 9 शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.27) 12 वीची परीक्षा सुरू असताना भरारी पथकाने या ठिकाणी भेट देऊन तपासणी केली असता या ठिकाणी काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले आणि या सर्व प्रकाराला या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्ष रित्या जबाबदार असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकारानंतर पथकातील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जालींदर नारायण काटे ( परिक्षा केंद्र संचालक) 2)रावसाहेब शामराव भामरे ( उप केंद्र संचालक) 3) कुचेकर प्रकाश, 4) दिवेकर विकास, 5) गोरगल शाम, 6) काशीद कविता, 7) गवळी जयश्री, 8) होन सुरेखा, 9)सोननवर अभय या शिक्षकांवर महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन 1982 ( महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

SCROLL FOR NEXT