Latest

Taylor Swift : हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्ट डीपफेकची शिकार; आक्षेपार्ह फोटे व्हायरल

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलिवूड पॉप सिंगर टेलर स्विफ्टचे एआयच्या (AI) माध्यमातून तयार केलेले आक्षेपार्ह डीपफेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो ऑनलाइन प्रसारित झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबतचे वृत्त न्यूजवीकने दिले आहे. Taylor Swift

कॅन्सस सिटी चीफ्स गेममध्ये टेलर स्विफ्टने उपस्थिती लावली होती. तेथील तिचे फोटे एआयच्या माध्यमातून डीपफेक केले आहेत. त्यानंतर फोटो ऑनलाइन प्रसारित केले आहेत. Taylor Swift

न्यूजवीकच्या वृत्तानुसार, बुधवारी (दि. २४) आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवलेले टेलर स्विफ्टचे काही आक्षेपार्ह फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागले. हे फोटो कोणी शेअर केले हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र हे टेलर स्विफ्टच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. हे फोटो इतके आक्षेपार्ह आहेत की, ते येथे शेअरही करता येणार नाहीत. 'टेलर स्विफ्ट एआय' सोशल मीडियावरही ट्रेंड करत आहे.

Taylor Swift : बॉलिवूड सेलिब्रिटीही डीपफेकचे बळी

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना डीपफेकची शिकार झाली होती. याप्रकरणी एका संशयिताला अटकही करण्यात आली आहे. वास्तविक, एआयच्या मदतीने दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये रश्मिकाचा चेहरा मुलीच्या चेहऱ्यावर लावला होता. यानंतर नोरा फतेही आणि कतरिना कैफचा व्हिडिओही समोर आला होता. आता AI चा हा 'डर्टी गेम' हॉलिवूडमध्येही पोहोचला आहे. प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट याचा बळी ठरल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर एआयवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT