Latest

Tata iPhone : टाटा ग्रुप आता उतरणार मोबाईल निर्मितीमध्‍ये, iPhone15 पासून प्रारंभ

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील आघाडीचा उद्याेग समुह  टाटाने देशात ॲपलच्या आयफोनची निर्मिती सुरू केली आहे. (Tata iPhone) ॲपलचे सीईओ टिम कुक गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. ॲपलने मुंबई आणि दिल्लीत दोन ऑफलाइन आउटलेट सुरु केले आहे. दरम्यान टिम कुक यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्याशी मुंबईत भेट घेतली होती. या भेटीत भारतातील मेगा इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनबाबत चर्चा झाल्याचे समजते.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, Apple ने टाटा ग्रुपसोबत आयफोन 15 सीरीज भारतात तयार करण्यासाठी सज्ज आहे. ॲपलच्या या नव्या सीरिजचा मेक इन इंडिया फोन या वर्षाच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो. याआधी फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि लक्सशेअर सारख्या कंपन्या भारतात आयफोन असेंबल करत होत्या, मात्र आता टाटा ग्रुपही या शर्यतीत सामील झाला आहे. टाटा ग्रुप भारतात आयफोन बनवणारी चौथी कंपनी असेल. (Tata iPhone)

टाटा समूह भारतात Apple साठी iPhone 15 आणि 15 Plus चा एक छोटासा भाग एकत्र करेल. ॲपलच्या 2023 च्या आयफोन मॉडेलपैकी केवळ 5 टक्के समूह एकत्र करेल. उर्वरित कंपन्या – फॉक्सकॉन, लक्सशेअर आणि पेगाट्रॉन यांचा त्यात प्राथमिक हिस्सा असेल. ॲपलने चीनवरील आपले अवलंबित्व कमी करायचे असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. ॲपलने चीनपेक्षा भारताची निवड केली आहे. याचे कारण म्हणजे भारतात स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ आहे. तसेच, भारत तंत्रज्ञान हब म्हणून विकसित होत आहे. असा भारतात आयफोन 15 च्या असेंबलिंगचा दुहेरी फायदा आहे.

सप्टेंबरमध्ये लॉन्च होऊ शकते iPhone ची नवीन सिरीज

Apple या वर्षी सप्टेंबरमध्ये Apple iPhone 15 सीरीज लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीच्या 2023 मालिकेत चार मॉडेल्स असण्याची शक्यता आहे. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max. भारतात iPhones उशिरा येतात आणि विलंबाने शिपमेंट सारख्या समस्या देखील असतात. भारतातील उत्पादनामुळे आयफोन 15 सिरीजची किंमत कमी होण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT