Latest

Tata Harrier : टाटा हॅरिअरच्या नव्या व्हेरिएंट्स पाहिल्या का?, जाणून घ्या खास फिचर्स

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वी त्यांच्या विशेष काझीरंगा एडिशन मधील हॅरिअर सफारी (Safari), नेक्सॅान (Nexon), पंच (Punch) या SUV कार लॉंच केल्या आहेत. या नव्या व्हेरिएंट्स ग्लॅमरस अशा फिचर्सनी सुसज्ज आहेत. यापैकी अनेक व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड व्हर्जन प्रमाणे फिचर्समध्ये बदल केलेलादेखील पहायला मिळतोय.

Tata Safari

टाटा हॅरिअर कारच्या XT ट्रिम या मॅाडेलपासून स्पोर्ट्स एअर प्युरिफायर फिचर्सची सुरूवात होते. काझीरंगा एडिशन पासूनच्या पुढच्या व्हेरिएंट्समध्ये आणखी काही आकर्षक अशा फिचर्स पहायला मिळतात. या नवीन कारच्या बाह्य डिझाईन हे ग्रासलँड बेज (Grassland Beige body colour) आणि पियानो ब्लॅक रूफ (Piano Black roof) अशा वैशिष्ट्यपूर्ण दोन रंगांमध्ये पहायला मिळते. त्याचबरोबर या कारचे इंटिरिअर्सचे विशेष अश्या अर्थी बेज लेदरेट अपहोल्स्ट्री (Earthy Beige leatherette upholstery), बेज इन्सर्ट आणि ट्रॉपिकल वुड डॅशबोर्डसह येते.

काझीरंगा एडिशनमधील स्टँडर्ड फीचर्सने भरलेल्या एसयूव्ही कार ग्राहकांसाठी खास आकर्षक बनलेल्या आहेत. काझीरंगा हॅरिअर हवेशीर फ्रंट सीट्स, कनेक्टेड कार टेक, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो आणि एअर प्युरिफायर या फिचर्सनी सुसज्ज आहे.

Tata Nexon

ही सर्व वैशिष्ट्ये XT ट्रिमच्या आधीच्या कारमध्ये थोडी कमी पहायला मिळतात. एअर प्युरिफायर हे फिचर्स XT ट्रिम पासूनच्या पुढील व्हेरिएंट्समध्ये पहायला मिळते. तर XZ ट्रिमपासून वायरलेस ऍपल आणि Android कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. कनेक्टेड कार टेक तसेच हवेशीर सीट आता XZ+ ट्रिममध्ये पहायला मिळते.

Tata Punch

या सर्व हॅरिअरच्या SUV कार 2.0-लिटर Kryotec टर्बो-डिझेल इंजिन द्वारे सुसज्ज आहेत. जे 170 hp कमाल पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क निर्माण करते. या इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर पर्याय उपलब्ध आहे.

टाटा हॅरिअर ही एकूण 20 कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये सर्व ट्रिम्स, गिअरबॉक्स पर्याय, त्याचबरोबर स्पेशल एडिशन्स डार्क आणि काझीरंगा यांचा समावेश आहे. टाटा मोटर्सने देखील अलीकडेच हॅरियरसह त्यांच्या बहुतेक गाड्यांच्या किमती 47,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. काझीरंगा एडिशनच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही.

तर एंट्री-लेव्हल XE ट्रिम 3,000 रुपये , XZA+ डार्क एडिशनमध्ये 47,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यांची अंतिम किंमत ही एक्स-शोरूम रुपये 21.81 लाख एवढी झाली आहे. भारतीय बाजारपेठेत SUV सेगमेंटचा चाहतावर्ग खूप पहायला मिळत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात खूप स्पर्धा निर्माण झाली आहे. Tata Harrier ची Hyundai Creta, Kia Seltos, Jeep Compass, Skoda Kushaq, VW Taigun, MG Astor व Hector आणि Mahindra XUV700 सारख्या गाड्यांशी स्पर्धा आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT