Latest

Tamil Nadu: तामिळनाडूत मुसळधार; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दाबावामुळे तामिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार आणि सतत पावसाच्या पार्श्वभूमीवर नागापट्टिनम, तिरुवरूर आणि मायिलादुथुराई जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आज ( दि. २ ) बंद राहतील, अशी माहिती येथील जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चेन्नईसह तमिलनाडूच्या किनारी प्रदेशांत पाऊस सुरू आहे. येत्या ४८ तासांत रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, या भागातील कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे ३२ अंश सेल्सिअस राहणार आहे, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

फेब्रुवारीमध्ये पुढील काही दिवसात वायव्य भारतात काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे, तर या प्रदेशात थंडीची लाट येण्याची शक्यता खूप कमी आहे, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT