पुढारी ऑनलाईन डेस्क: तमिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ शनिवारी (दि.३०) पर्यटन बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. पर्यटन बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिकजण जखमी झालेत, असे वृत्त 'NDTV हिंदी' ने दिले आहे. (Tamil Nadu Bus Accident)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.३०) सायंकाळी हा अपघात झाला. अपघात मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये मृतांमध्ये चार महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. (Tamil Nadu Bus Accident)
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या अपघातातील मृतांबद्दल दु:ख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ झालेल्या बस अपघातातील जीवितहानीवर दुःख व्यक्त केले आहे. या अपघातील जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो, असेही पीएम मोदी यांनी म्हटले आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे. (Tamil Nadu Bus Accident)