पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या 'जेलर' या बहुप्रतीक्षित चित्रपटातून 'कावला' या गाण्यामधून चर्चेचा विषय ठरतेय. चार्टबस्टर तमिळ गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकल्यानंतर आता हे गाणं हिंदीत येणार आहे. तू आ दिलबरा हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
UFO Moviez ने उत्तर भारतासाठी जेलरचे हिंदी गाणं लवकरच येणार आहे. यानंतर लगेचच सन पिक्चर्सने सनसनाटी अनिरुद्ध-रचित ट्रॅकची हिंदी आवृत्ती लॉन्च करण्याची घोषणा केली. तू आ दिलबरा चे हिंदी गीत रकीब आलम यांनी लिहिले आहे तर सिंधुजा श्रीनिवासन यांनी ते गायले आहे.
इन्स्टाग्रामवर हे गाणं लॉन्च झाल्यापासून ते अल्पावधीत ट्रेंडिंग गाण झालं आहे. नेटकऱ्यांनी तमन्नाच्या हूक स्टेपने गाण्याला अनोखं प्रेम दिलं. कावलाचा गीतात्मक व्हिडिओ देखील YouTube वर तब्बल ५० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहे. 'तू आ दिलबरा' या गाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
जेलर व्यतिरिक्त तमन्ना भाटियाकडे अनेक एक मनोरंजक प्रोजेक्ट्स लाईनअप आहेत. मल्याळममध्ये बांद्रा, तेलुगुमध्ये भोला शंकर आणि तमिळमध्ये अरनमनाई 4 यातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.