Latest

Jailer Movie : कावला गाण्यात तमन्ना भाटियाच्या पहिल्या गाण्याची झलक (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या बी-टाऊनमध्ये ज्याची चर्चा आहे, अशी अभिनेत्री तमन्ना भाटिया! तिच्या बॅक टू बॅक अफलातून प्रोजेक्ट्समुळे ती चर्चेत आहेत. अलीकडेच तिच्या अ‍ॅमेझॉन प्राईमवरील 'जी करदा' आणि 'नेटफ्लिक्स'वरील 'लस्ट स्टोरीज-2' या हिंदी रिलीज यशानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Jailer Movie ) याचं कारण तितकचं खास आहे. तमिळ चित्रपट जेलरमधील "कावला" डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली. 6 जुलै रोजी हा बहुचर्चित गाण्याची झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली. तमन्ना या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिग्गज अभिनेते रजनीकांतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Jailer Movie)

व्हायरल झालेला संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि दिग्दर्शक नेल्सन यांच हे गाणं लाँच झालं आहे. एका खास प्रोमोमधून हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कावलाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तमन्ना भाटियाने तिच्या अफलातून डान्स मुव्ह्जने स्क्रीनवर एक वेगळी मज्जा आणली आहे.

तमन्ना भाटिया तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रत्येक प्रकल्पांच्या यशाने ती सध्या टॉप लिस्ट वर आहे. जेलर व्यतिरिक्त तिच्याकडे मल्याळममध्ये बांद्रा आणि तेलुगुमध्ये भोला शंकर हे चित्रपट असून तमिळमध्ये अरनामनाई 4 हा एक मोठा चित्रपट ती करणार आहे.

SCROLL FOR NEXT