Latest

Taliban leader order : तालिबानी फर्मान, अफगाणिस्‍तानमध्‍ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा सक्ती

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अफगाणिस्‍तानमधील सत्ता काबीज करुन एक वर्ष होण्‍यापूर्वी तालिबान्‍यांनी पुन्‍हा एकदा आपले रंग दाखविण्‍यास सुरुवात केली आहे. मागील सरकारपेक्षा आमचे सरकार अधिक चांगला कारभार करेल, असा दावा करणार्‍या तालिबान्‍यांनी आज महिलांसाठी नवा आदेश जारी केला. आता अफगाणिस्‍तानमध्‍ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना बुरखा सक्‍ती करण्‍यात आल्‍याचे या आदेशात म्‍हटलं आहे. ( Taliban leader order )

७ ऑगस्‍ट २०२१ रोजी राष्‍ट्रपती अशरफ गनी यांना हटवत तालिबान्‍यांनी अफगाणिस्‍तानमधील  सत्ता काबीज केली हाेती. सत्ता स्‍थापनेनंतर जगासमोर आपली प्रतिमा सुधारण्‍याची धडपड या सरकारने सुरु केली. आम्‍ही बदलले आहोत. यापुढे नागरिकांना कोणत्‍याही नियमांची सक्‍ती असणार नाही. नागरिकांना आपल्‍या इच्‍छेनुसार जगण्‍याचे स्वातंत्र्य असेल, असा दावा सरकारकडून केला जात होता. मात्र काही दिवसानंतर तालिबान सरकारने आपला खरा रंग दाखविण्‍यास सुरुवात केली आहे.

Taliban leader order : आता सार्वजनिक ठिकाणी महिलांना बुरखा सक्‍ती

सत्ता स्‍थापनेला एक वर्ष पूर्ण होण्‍यापूर्वी तालिबान सरकारने अनेक नवीन नियम नागरिकांवर लादले. यापूर्वीच सरकारी नौकरी करणाय्‍या पुरुषांच्‍या टोपी , दाढीची सक्‍ती केली. तसेच शाळेतील मुले आणि मुली याचे शिक्षण स्‍वतंत्रपणे होईल. आता देशभरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांना बुरखा सक्‍ती असेल, असा नियम जाहीर करण्‍यात आला आहे.

सत्तांतरानंतर अफगाणमधील दहशतवाद हल्‍ल्‍यात वाढ

अफगाणिस्‍तानमध्‍ये सत्तांतर झाल्‍यापासून दहशतवादी हल्‍ल्‍यात वाढच झाली आहे. बॉम्‍बस्‍फोटांसह आत्‍मघाती हल्‍ल्‍यात नागरिकांचे बळी जात आहेत. दहशतवादी हल्‍ल्‍यात मुलांसह महिलांनाही टार्गेट केले जात आहे.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT