Latest

तळेगाव स्टेशन : पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होवू नये यासाठी यंत्रणा सज्ज

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा : मावळ परिसरात सहारा, आंद्रलेक, लोणावळा, तळेगाव दाभाडे, उर्से, आंबी आदी ठिकाणी उपकेंद्रे आहेत. तेथून वीज वाहीन्यांचे जाळे मावळ परिसरात पसरले आहे. याबाबत वेळोवेळी देखभाल करण्यात येत असतेच परंतु, आता लवकरच साधारण जुन महिन्यापासुन पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होवू नये यासाठी आणखी दक्षता घेतली जाते. पावसाळ्यात आणि त्यावेळी होणा-या वादळ वा-यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याची शक्यता असते. यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होवू नये आणि वीज खात्याचेही नुकसान होवू नये यासाठी वीज महापारेषण आणि महावितरण कंपन्यांची प्री मान्सून मेन्टेनन्सची कामे वेगात चालु आहेत.

अति उच्चदाब वाहीन्यांचे टॉवर फुटींग रेजीस्टन, मेगरने टेष्टींग घेणे तसेच टॉवर ते टॉवर अर्थ वायर चेकींग करणे, उपकेंद्रामध्ये लाईटींग अरेस्टर लिकेज करंट चेक करणे, पाण्याने भिजू नये यासाठी एमबी बॉक्सला, बुकॉझ रिलेला आदी इक्युपमेंटला प्लास्टिक कव्हर लावणे, इक्युपमेंटची डायग्नोस्टीक टेस्ट घेणे, आयसोलेटर मेन्टेनन्स, ऑइल लिकेज काढणे, लेवल करणे, उपकेंद्र यार्डात केबल चारीमध्ये आदी ठिकाणी पाणी साचते तेथे पाणी साचु नये यासाठी उपाययोजना करणे, बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती होणेसाठी पर्यायी केबल, रिले, आदी आवश्यक यंत्रणा तयार ठेवणे, रात्री-अपरात्री बिघाड झालेस कामात अडथळा येवू नये यासाठी उजेडाची व्यवस्था तत्पर ठेवणे, गवत कटींग, आदी कामे करण्यात येत आहेत.

तसेच महावितरणकडून वीज पुरवठा करणा-या तारांना रस्त्याच्या कडेच्या झाडांच्या फांद्या स्पर्श करतात त्या छाटणे, वीज पुरवठ्यामुळे वीक झालेल्या तारा बदलणे, जम्प बदलणे तसेच वीक ईन्सुलेटर बदलणे, ट्रान्सफॉर्मरचे आणि डीपी बॉक्स मेन्टेनन्स करणे ऑईल लेवल पाहणे, एबीस्वीचचे ग्रीसींग आदी कामे वेगात चालु आहेत. ही कामे करताना विद्युत पुरवठा जास्तवेळ खंडीत होवू नये याबाबत काळजी घेण्यात येत असते. अशी माहिती भूषण पाटील उपकार्यकारी अभियंता वीज महापारेषण उपकेंद्र तळेगाव दाभाडे आणि राजेंद्र गोरे उपकार्यकारी अभियंता वीज महावितरण तळेगाव दाभाडे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT