Latest

Adishakti मालिकेत झळकणार सुयश टिळक-पल्लवी पाटील

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : "सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ, सहज नाही लागणार या आदिशक्तीचा ठाव", असं म्हणत 'सन मराठी'ने नुकताच 'आदिशक्ती' मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री पल्लवी पाटील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कोण-कोणाच्या विरोधात उभं राहिल, कोण-कोणाचा शत्रु बनेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही? आणि वडीलांची शत्रु स्वत: त्यांची मुलगी असेल तर काय?… भितीने थरकाप उडेल अशी घटना चिमुकल्या जीवाशी घडणार असेल तर आईचं काळीज घाबरणारच… पण आई लेकीच्या संरक्षणासाठी आदिशक्तीकडे प्रार्थना करणार आणि तिच्या पाठीशी उभी राहणार दैवी शक्ती, हे या प्रोमोमधून दाखवण्यात आलं आहे.

रोमांचक, थरारक, कथेशी खिळवून ठेवणारी कथा घेऊन 'सन मराठी' वाहिनी नव्या पध्दतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. दैवी शक्ती नेहमी चांगल्या कर्माच्या, माणसांच्या पाठीशी उभी असते हे या मालिकेतून अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच सुयश टिळक, पल्लवी पाटील, सावी केळकर, अंबरिश देशपांडे, सुश्रुत आदी कलाकारांचा अभिनय अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळतेय. एकंदरीत ही नवी मालिका प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT