Latest

बिबट्याच्या कातडी तस्करीचा नाशिकच केंद्रबिंदू ; शहापूर वनविभागाचा संशय

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक वनवृत्तात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात अधिवास आढळून येतो. बिबट कातडी तस्करीचे धागेदोरे नाशिकपर्यंतच येऊन थांबत असून, मृत बिबट हे याच परिसरातील असल्याचा संशय शहापूर वनविभागाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्येच सर्वाधिक संशयित आढळल्याने बिबट अवशेषांच्या तस्करीवर शिक्कामोर्तब होत आहे. बिबट्याच्या तस्करीत स्थानिक टोळ्या सक्रिय असल्याने त्यांच्यावर वनविभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात शहापूर वनविभागाने सिन्नर-इगतपुरी मार्गावर कारवाई करत बिबट्याची कातडी हस्तगत केली होती. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांच्या पथकाने जव्हार, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सात संशयित ताब्यात घेतले. पुढील तपासात इगतपुरीच्या एका महिलेसह तिघांना अटक झाली. आतापर्यंत 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन कातड्यांसह बिबट्याच्या त्वचेचे काही अवशेष हस्तगत केले आहेत.

बिबट्याचा अधिवास असलेल्या समृद्ध जंगलात शिरून मृत बिबट्या किंवा त्यांची शिकार करून त्यांच्या कातडीची तस्करी करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक टोळ्यांच्या मदतीने 'स्लीपर सेल' कार्यरत आहे. प्रामुख्याने नाशिक वनवृत्तातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जव्हारसह ठाणे भागातील वनक्षेत्रात त्याचे 'नेटवर्क' आहे. 'स्लीपर सेल'ची पाळेमुळे शोधण्यासाठी वनविभागाने या परिसरात लक्ष केंद्रित केले आहे.

दरम्यान, बिबट कातडी तस्करीच्या गुन्ह्यात अनेक संशयित असून, बर्‍याच कातडीचे व्यवहार सुरू आहे. कारवाईच्या धास्तीने काही तस्कर भूमिगत झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली.

हापूर वनविभागाची कारवाई
2  फेब्रुवारी : सिन्नर-घोटी महामार्गावरून बिबट्याची पूर्ण कातडी
4 फेब्रुवारी : ठाण्यातील मुरबाडमधून बिबट्याची पूर्ण कातडी
7 फेब्रुवारी : कसार्‍यातील होलाची वाडीतून कातडीचे अवशेष

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT