Latest

Suryakumar Yadav Big Loss : सूर्यकुमार यादवचे मोठे नुकसान!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार टी 20 फलंदाज सूर्यकुमार यादवने ताज्या आयसीसी टी 20 क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन करून सूर्या नंबर वन बनला होता. त्याने 5 डावात 3 अर्धशतकांची खेळी केली आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मागे टाकून अव्वल स्थान गाठले होते. सूर्याने 869 गुण मिळवले होते, जे उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर 859 गुणांवर घसरले. असे असले तरी त्याने पहिले स्थान कायम ठेवले आहे. (Suryakumar Yadav Big Loss in T20I batting rankings points)

टी 20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर सूर्यकुमार यादव हा तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. त्याने 189.68 च्या स्ट्राइक रेटने आणि 59.75 च्या सरासरीने 239 धावा केल्या. सूर्याशिवाय ताज्या क्रमवारीत टी 20 वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी क्रमवारीतही झेप घेतली आहे. इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सने भारताविरुद्ध उपांत्य फेरीत 47 चेंडूंत 86 धावांची खेळी केल्यानंतर त्याने 22 स्थानांनी झेप घेतली आहे. आता तो 12व्या क्रमांकावर पोहोचला आहे. हेल्स वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडसाठी दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 42.40 च्या सरासरीने 212 धावा केल्या.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही पहिल्या दहामध्ये एका स्थानावर झेप घेतली आहे. आता तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने मॅचविनिंग इनिंग खेळली होती. दक्षिण आफ्रिकेच्या रिले रुसोनेही 7व्या स्थानावर मजल मारली आहे. तर न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप आठव्या क्रमांकावर घसरला आहे.

अशी आहे फलंदाजांची टी 20 रँकिंग…

1. सूर्यकुमार यादव – 859
2. मोहम्मद रिझवान – 836
3. बाबर आझम – 778
4. डेव्हॉन कॉन्वे – 771
5.एडेन मार्कराम – 748
6.डेव्हिड मालन – 719
7.रिले रुसो – 693
8.ग्लेन फिलिप्स – 684
9. आरोन फिंच – 680
10. पथुम निस्संका – 673

गोलंदाजीतही इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले…

गोलंदाजीच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर उपांत्य आणि अंतिम फेरीत चांगली गोलंदाजी करणाऱ्या आदिल रशीदच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. रशीदने 5 स्थानांची झेप घेतली असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात 20 धावांत 1 आणि अंतिम सामन्यात 22 धावांत 2 बळी घेतले. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज सॅम करणने 5 वे स्थान गाठले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत शाकिब-अल हसन, मोहम्मद नबी आणि हार्दिक पंड्या यांचा अनुक्रमे पहिल्या तीनमध्ये समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT