पुढारी ऑनलाईन : मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. (NCP leader Nawab Malik) नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. याआधी २३ ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव २ महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. तो ऑक्टोबरमध्ये ३ महिन्यांनी वाढवला होता. मलिक यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्याचे त्यांच्या वकिलाचे म्हणणे ग्राह्य धरून त्यांच्या जामिनाला मुदतवाढ दिली होती. आता त्यांच्या जामिनाला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
हा कालावधी संपुष्टात येताच नवाब मलिकांच्या वकिलाने त्यांच्या प्रकृतीचे कारण देत अंतरिम जामीन वाढवून मिळावा अशी मागणी केली होती. नवाब मलिक यांच्या मुत्रपिंडाच्या आजाराबाबत तसेच त्यांच्या वैद्यकीय अहवालाबाबतचे तपशील न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर मांडला होता. त्यानंतर खंडपीठाने प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्याने अंतरिम जामिनाला याआधी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.
हे ही वाचा :