Latest

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदासाठी तीन नावांची कॉलिजियमकडून शिफारस

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीं पदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने ( Supreme Court Collegium ) तीन नावांची शिफारस केली आहे. ऍड. शैलेश ब्रम्हे, ऍड. फिरोज पुनीवाला आणि ऍड. जितेंद्र जैन यांच्‍या नावाची शिफारस सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या कॉलिजियमकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आपल्या दोन वरिष्ठ सहकारी न्यायमूर्तींसोबत वरील तीन नावांवर चर्चा केली होती. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय विभागाकडे गत एप्रिल महिन्यात सुपूर्द करण्यात आला होता. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने शिफारशींना मंजुरी देत फाईल केंद्र सरकारकडे पाठविली आहे. दरम्यान, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कायम न्यायमूर्ती म्हणून रॉबिन फुकन यांच्या नावाचा प्रस्तावही कॉलिजियमने सरकारकडे पाठविला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT