Latest

Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदर IPL मधून बाहेर, सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचे पहिले सत्र संपले आहे. सर्व संघांनी 7-7 सामने खेळले असून आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. मात्र, हे सत्र सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद कॅम्पमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (washington sundar) आयपीएलमधून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याची पुष्टी केली आहे. सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे तो आयपीएलच्या चालू हंगामातील पुढील सामने खेळताना दिसणार नाही, असे फ्रँचायझीने ट्विट केले आहे. सुंदरऐवजी कोणता खेळाडू संघाचा भाग असेल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

यंदाच्या हंगामात एसआरएच संघाला चांगली कामगिरी झालेली नाही. सुरुवातीच्या 7 सामन्यांपैकी 5 गमावल्यानंतर एसआरएचचा संघ 9व्या स्थानावर आहे. पहिल्या 6 सामन्यात सुंदरला एकही विकेट घेता आली नाही. मात्र गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध तो लयीत परतला आणि त्याने 3 बळी घेतले. त्या सामन्यात त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. पण तो सामना हैदराबादने गमावला. अशातच आता सुंदरच्या दुखापतीमुळे संघाचे मोठे नुकसान होऊ शकते.

सुंदरची आयपीएल कारकीर्द कशी राहिली? (washington sundar)

2017 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या सुंदरने (washington sundar) 58 सामने खेळले असून 7.36 च्या इकॉनॉमी रेटने 36 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, 16 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचा इकॉनॉमी रेट 7.34 आहे. या काळात त्याच्या बॅटमधून 378 धावा झाल्या आहेत. सुंदरने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 8.26 च्या इकॉनॉमीने 3 बळी घेतले आहेत.

सुंदरला दुखापतीचे ग्रहण (washington sundar)

दुखापतीमुळे सुंदरला सतत त्रास होत आहे. याआधी, तो बोटाच्या दुखापतीमुळे 2021 यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या च्या आयपीएल हंगामातून बाहेर पडला होता. त्यावेळी तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) च्या संघाचा भाग होता. गतवर्षी तो कोरानामुळे द. आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला होता. यानंतर, हॅमस्ट्रिंगमुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग होऊ शकला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT