Latest

Sunny Deol : सनी देओलला दिलासा, बँकेने जुहू बंगल्याची लिलावाची नोटीस मागे घेतली

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गदर २ अभिनेता सनी देओलला मोठा दिलासा मिळाला आहे. बँक ऑफ बडोदा बँकेने जुहू बंगल्याची (Sunny  Deol ) लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. त्यामुळे सनी देओलच्या जुहू येथील सनी व्हिला बंगल्याचा ई-लिलाव होणार नाही. (Sunny Deol )

अभिनेता सनी देओलच्या सनी देओलच्या जुहूतील बंगल्याचा लिलावाची माहिती समोर आली होती. ५६ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने त्याच्या बंगल्याच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 25 सप्टेंबरला हा लिलाव होणार होता.

सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले होते. जुहू येथील सनी व्हिला नावाचा बंगला त्यासाठी तारण ठेवण्यात आला होता. मात्र या कर्जाची परतफेड सनी देओलने केली नसून ५६ कोटींची रक्कम थकविली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी अखेर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ५१ कोटी ४३ लाख रुपये अशी बोली लावण्यात आली होती. पण आता बँकेने ई-लिलावाची नोटीस अखेर मागे घेतली.

SCROLL FOR NEXT