Latest

Summer Health : उन्हाळी लागल्यास काय करावे, घरच्या घरी करा उपाय

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळ्यात जरादेखील तापमान वाढले की अंगाची लाही लाही होते. (Summer Health) अनेकवेळा शरीरात पाणी कमी पडून अशक्तपणा येणे, चक्कर येणे आणि उन्हाळी लागण्यासारखे प्रकार घडतात. शरीरातील उष्णता खेचली जावी यासाठी काही वेळा बेंबीमध्ये खाण्याच चुना लावला जातो. परिणामी, थोडा फरक पडतो. पण, काहींना संपूर्ण उन्हाळा हा त्रास होत राहतो. उन्हाळी लागणे सामान्य गोष्ट आहे. उन्हाळी लागल्यानंतर फार घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही घरच्या घरी उपाय करून होणारा त्रास कमी करू शकता. (Summer Health)

सोप्या भाषेत उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना मूत्रमार्गाला दाह जाणवतो. कधी औषधांच्या अतिसेवनानेदेखील उन्हाळी लागते. तर मूत्रमार्गात इनफेक्शन झाल्यामुळेही उन्हाळी लागते. जर उन्हाळी तीव्र झाल्यास लघवीच्या जागी तीव्र वेदना होतात आणि जळजळ होते. कधी कधी प्रायव्हेट पार्टवर पुरळ अथवा लाल चट्टे पडतात. मूत्रमार्गाला दाह होतो. अशा अचानक उद्भवलेल्या परिस्थतीवेळी काय करायचं असा प्रश्न पडतो. यावर तुम्हाा घरच्या घरी उपाय करू शकता

भरपूर पाणी प्या – उन्हाळा सुरु झाला की, लगेच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. पुरेसे पाणी प्यायले नाही तर शरीर डिहायड्रेट होतं. परिमामी, काही वे‍ळा ताप पण येतो. त्यामुळे तहन लागली की लगेच पाणी प्या.

लिंबू सरबत प्या – शरीरात ओलावा टिकून राहण्यासाठी दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. या पाण्यात तुम्ही सब्जा बी देखील घालून पिऊ शकता. लिंबू सरबत करून प्या.

नाचणीची आंबील प्या- नाचणीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम फायबर, कार्बोहायड्रेड्स हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात मिळतात. नाचणी आंबील प्यायल्याने ॲसिडीटी, गॅस होणे, जळजळ होणे, अपचन असे पोटासंबंधित आजार होत नाहीत.

जिरे, धनेपूड, कोथिंबीर घालून ताक प्यावे – ताक हे शरीरातील विषारी पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढते. दह्यासोबत जिरं खावं. पण, जिऱ्याचं अतिसेवनही करू नये. जलजिरा हे उन्हाळ्यात तहान भागवतं. पचनक्रिया सुधारण्यासाठी जिरे पावड घालून ताक प्यावे. शरीराला उन्हाचा त्रास होण्यापासून हे पेय वाचवतं. धने हे पोटातील दाह कमी करते. ताकामधून कॅल्शियम, फॉस्फरस व लॅक्टोबॅसिलस मिळते.

व्हिटॅमिन सी आहार घ्या – व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्या- निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्यायला हवा. उन्हाळ्यात संत्री, लिंबू, पपई, मोसंबी, पेरू, किवी, आंबा खायला हवे.

SCROLL FOR NEXT