Latest

प्रेमास नकार : फ्रेंडझोन करणाऱ्या तरुणीवर ठोकला चोवीस कोटी रुपयांचा दावा

दिनेश चोरगे

सिंगापूर; वृत्तसंस्था : आपल्या भावनांशी खेळ केल्याच्या आरोपावरून सिंगापूरमध्ये संतापलेल्या तथाकथित प्रियकराने आपल्या मैत्रिणीवर २४ कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. या प्रकरणाची सुनावणी ९ फेब्रुवारीला न्यायालयात होणार आहे.

प्रेयसीने प्रेमाला नकार देत फक्त मित्र बनून राहूया, असे सांगितले. त्यामुळे तिच्या मित्राचा जळफळाट झाला. के. कॉशिगन असे मुलाचे नाव असून मुलीचे नाव आहे नोरा टॅन. नोराने कॉशिगनचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारुन आपण फक्त चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. आपण जिच्यावर जीवापाड प्रेम करतोय, तिच्यासाठी आपली किंमत केवळ एका मित्राएवढीच असल्याचे समजल्यावर कॉशिगनची सटकली.

स्ट्रेट टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांची पहिली भेट २०१६ मध्ये झाली होती. दोघांत मैत्रीचे नाते निर्माण झाल्यानंतर कॉशिगनच्या मनात नोरासाठी प्रेम जागृत झाले. नोराच्या मनात तशी काही भावना नव्हती. सप्टेंबर २०२० मध्ये नोराच्या लक्षात आले की, कॉशिगनच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू आहे. त्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. आपला मानसिक छळ झाल्याचा खटला कॉशिगन नोरावर दाखल करणार होता. मात्र, नोराने त्याच्यासोबत समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी हा वाद तात्पुरता शमला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT