Latest

Study of marine debris : समुद्रातील कचर्‍याचा अभ्यास; गोवा राज्य जैवविविधता मंडळाची अनोखी मोहीम

backup backup

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्याच्या किनारपट्टीवर लाटा जेव्हा किनार्‍याला भिडतात तेव्हा सीफोमसह विविध प्रकारचे मलबे येतात. जसजसे पाणी ओसरते तसतसे किनार्‍यांवर केवळ भरतीच्या रेषाच नाहीत तर प्लास्टिक आणि इतर कचर्‍याच्या रेषा उरतात. यासाठी एका अनोख्या प्रयत्नांत, गोवा राज्य जैवविविधता मंडळातर्फे या रेषेचा आणि समुद्रात फेकल्या जाणार्‍या कचर्‍याच्या स्वरूपाचा अभ्यास सुरू करण्यात येणार आहे. यात सर्व 44 किनारी गावांची जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची मदत घेतली जाणार आहे.

डेब्रिज लाईन्स म्हणजेच किनार्‍यावर तयार झालेल्या रेषा तपासणी करून त्यानुसार प्रक्रिया करण्यासाठी कचरा गोळा केला जाईल. किनार्‍यावर वाहून गेलेले कोणतेही समुद्री शेवाळ गोळा केले जातील आणि संरक्षणासाठी आणि पुढील अभ्यासासाठी पाठवले जातील.
लाटा ओसरल्या की, किनार्‍यावर रेषा तयार होते. मात्र अद्यापपर्यंत या रेषांचा कोणताही अभ्यास केलेला नव्हता. काहीवेळा समुद्री शेवाळ, मृत प्राणी, जेलीफिश आणि स्टारफिश किनार्‍यावर येतात, असे राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष प्रदीप सरमोकादम यांनी सांगितले. ते म्हणाले, समुद्राच्या शेवाळाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अशा कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाशी करार करत आहोत. प्लास्टिकचे अवशेष हे पंचायतींसाठी विल्हेवाट लावणे सर्वात कठीण आहे. समुद्रकिनारे सर्वात असुरक्षित बनत आहेत. अशा कचर्‍याचा समुद्र किनार्‍यांवरील विविध परिसंस्थांवर परिणाम होऊ शकतो. प्रकल्प आणि त्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आम्ही 44 किनार्‍यांवरील गावांत जैवविविधता समितीच्या सदस्यांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनीही या उपक्रमाला मान्यता दिली आहे, असे सरमोकादम यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT