Latest

Ukraine-Russia war : “व्लादिमीर पुतीन यांना थांबवा”, युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची जगाला विनंती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवर हल्ला केला आहे. इतकंच नाही तर ते खूप आक्रमक झालेले आहेत. पुतीन यांनी युक्रेनच्या सैनिकांना धमकी देताना म्हणाले की, "शस्त्रास्त्रं खाली ठेवा आणि आपापल्या घरी निघून जा." राॅयटर्सच्या माहितीनुसार पुतीन युक्रेनच्या सैनिकांना म्हणाले की, "मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की, शस्त्रास्त्रं खाली ठेवा आणि घरी निघून जा. युक्रेनचे जे सैनिक आमचं ऐकतील, त्यांना युद्धातून सुरक्षित पाठविण्याची परवानगी दिली जाईल आणि त्यांना घरातील सदस्यांना भेटण्याची संधी मिळेल." दरम्यान युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाची हल्ल्याची पुष्टी केलेली आहे. इतकंच नाही, व्लादिमीर पुतीन यांना थांबवा, अशी विनंती जगातील इतर देशांना त्यांनी केली आहे. (ukraine-russia war)

युद्धाच्या घोषणेनंतर तेलाच्या किमती १०० डाॅलरवर

रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई करणार असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केली आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. पुतीन यांनी इतर देशांना इशारा देताना म्हणाले की, "रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही". युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे ७ वर्षांत पहिल्यांदाच तेलाचे भाव १०० डाॅलरवर पोहोचले असल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

रशियाचे राष्ट्ररती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शरणागती पत्करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर या युद्धात हस्तक्षेप करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा पुतीन यांनी इतर देशांना दिला आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. युद्धाच्या घोषणेमुळे तेलाच्या किमती १०० डाॅलरवर गेलेल्या आहेत, असे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेकडून देण्यात आले आहे. (ukraine-russia war)

युक्रेनमध्ये ३० दिवसांची आणीबाणी जाहीर

रशिया आक्रमण करेल, या भीतीने युक्रेन बुधवारी आणीबाणी जाहीर केली आहे आणि रशियामध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना मायदेशी बोलविले आहे. दुसरीकडे रशियाने किवमध्ये असणाऱ्या दूतावासाला रिकामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण, दोन्ही देशांचे सैनिक मोठ्या संख्येने पूर्व युक्रेनच्या सीमेवर तैनात आहेत.

युरोपीय संघाने युक्रेनमधील दोन वेगवेगळ्या क्षेत्रांना स्वतंत्र संस्थेच्या मान्यता दिल्यानंतर रशियाना त्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक आपतकालीन शिखर संमेलन बोलविले आहेत. दरम्यान, रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची योजनेसंदर्भातील पुष्टी केलेली नाही. तसेच रशियाविरोधातीत क्रियांना त्यांनी इशारा दिला आहे.

बुधवारी युक्रेन ३० दिवसांचा आणीबाणी घोषीत केली आहे आणि रशियामध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना मायदेशी परत येण्याचे आवाहनही केलेले आहे. युक्रेनच्या पूर्व सीमेवरील वाढता तणावर पाहता ही आणीबाणी ३० दिवसांसाठी वाढवली जाण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी सांगितले की, "रशिया पुढे काय करू शकेल, यासंदर्भात मी सांगू शकत नाही. तो विभक्तवादी किंवा रशियाचे राष्ट्रपती यांच्या वैयक्तिक निर्णयाचा भाग आहे."

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT