Latest

Stock Market Updates | सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला, जाणून घ्या JFS शेअर्सची स्थिती?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणात्मक बैठकीतून दिलेले महागाईबाबत जोखीम असल्याचे संकेत आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, आज शुक्रवारी शेअर बाजारात घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरून ६४,८०० च्या खाली आला. तर निफ्टी १९,३०० च्या खाली आला. सकाळच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून आली. (Stock Market Updates)

सेन्सेक्स आज ६५ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ६४,८०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक आणि जियो फायनान्सियल सर्व्हिसेस हे शेअर्स टॉप लूजर्स आहेत. इंडसइंड बँकेचा शेअर २.२२ टक्क्यांनी घसरून १,३९३ रुपयांवर आला. तर बाजारात लिस्ट झाल्यापासून ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये अडकलेला जियो फायनान्सियलचा शेअर आज १.५७ टक्के घसरून २१२ रुपयांवर आला आहे. (Stock Market Updates)

एलटी, टेक महिंद्रा, एसबीआय, अल्ट्राटेक, टीसीएस, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्सही घसरले आहेत. तर मारुती, बजाज फायनान्स हे शेअर्स वाढले आहेत.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT