Latest

Stock Market : सेन्सेक्स-निफ्टीने गाठला नवा सार्वकालिक उच्चांक; वाचा ‘टॉप गेनर्स आणि लूजर्स’

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market : भारतीय शेअर बाजाराने आज गुरुवारी सकाळी नकारात्मक सुरुवात केली. मात्र, थोड्या वेळातच यू टर्न घेत सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनी उसळी घेतली. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा सर्वकालीक उच्चांक गाठला. सेन्सेक्स दुपारच्या सत्रात 67183.5 वर आहे. तर निफ्टी 19,880 वर आहे. तर बँक निफ्टी 45780 वर पोहोचला असून रिलायन्स आयटीसी या सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. तर डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजचे शेअर्स 1.86 टक्क्यांनी वाढले आहे. निफ्टी 50 वर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, पॉवर ग्रिड, एसबीआय लाइफ, एनटीपीसी आणि बीपीसीएल यांचा सर्वाधिक फायदा झाला, तर इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, सिप्ला, हिरो मोटोकॉर्प आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना तोटा झाला.

आज सकाळी बाजार उघडल्यानंतर देशांतर्गत निर्देशांक घसरले होते. NSE निफ्टी 50 25.50 अंकांनी किंवा 0.13% नी 19,807.65 वर घसरला आणि BSE सेन्सेक्स 106.08 अंकांनी किंवा 0.16% घसरून 66,991.36 वर आला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, बँक निफ्टी 33.40 अंक किंवा 0.07% वाढून 45,702.70 वर, निफ्टी आयटी 0.71% घसरला, निफ्टी ऑटो 0.13% घसरला तर निफ्टी फार्मा 0.22% आणि निफ्टी पीएसयू बँक 0.31% वधारला.

मात्र, त्यानंतर बाजाराने यु टर्न घेत सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही उसळी घेतली आणि दुपारच्या सत्रापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीने आपला सार्वकालिक उच्चांक गाठला.

Stock Market : BSE वर या कंपन्या टॉप गेनर्स आणि लूजर्स ठरल्या आहेत

BSE वर 30 कंपन्यांच्या शेअर्समुळे आज नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. आयटीसी, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल), कोटक बँक आणि एसबीआयने सर्वाधिक नफा मिळवला तर इन्फोसिस, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस आणि विप्रो यांचा तोटा झाला.

NSE निफ्टी 50 ने आज 19,869.40 वर नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला. डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल), सन फार्मा आणि सिप्ला हे सर्वाधिक नफा मिळवणारे होते तर इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, हीरो मोटोकॉर्प आणि आयशर मोटर्स हे नुकसानीत होते.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या किमतीत विक्रमी वाढ

युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने कंपनीच्या API उत्पादन सुविधेमध्ये पूर्व-मंजुरी तपासणी (PAI) आणि नियमित GMP तपासणी पूर्ण केली. श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश येथे आणि शून्य निरीक्षणे आणि नो अॅक्शन इंडिकेटेड (NAI) वर्गीकरणासह तपासणी बंद केली. त्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअरच्या किमतीत आज 1.86% वाढ झाली आणि रु. 5,318.75 वर नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात 8.6% आणि गेल्या एका वर्षात 19% वाढ झाली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT