Latest

Opening Bell : सकारात्‍मक सुरुवात; पण सेन्सेक्समध्‍ये पुन्‍हा घसरण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शेअर बाजारात आज (दि.६) सुरुवात सकारात्‍मक झाली. बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांनी मंगळवारचे ट्रेडिंग सत्र सकारात्मक क्षेत्रात उघडले. मात्र सकारात्मक सुरुवातीनंतर प्रमुख बाजार निर्देशांक घसरले. सेन्सेक्स 71,970 वर उघडला आणि 71,750 च्या जवळ आला. निफ्टीही 21,780 च्या पातळीवर सपाटपणे व्यवहार करत आहे.दरम्‍यान, सोमवार, ५ फेब्रुवारीला सेन्सेक्स 354 अंकांनी घसरून 71,731 वर बंद झाला होता.

सोमवार, ५ फेब्रुवारीला आशियाई बाजार अर्ध्या टक्क्यांहून तर अमेरिकन बाजार एक चतुर्थांश टक्क्यांनी घसरले. जागतिक बाजारातून मिळणारे नकारात्‍मक संकेतचा परिणाम आज देशातंर्गत बाजारावर दिसत आहेत.

आयटी आणि ऑटो शेअर्स चमकले

आजच्‍या प्रारंभीच्‍या व्‍यवहारात भारती एअरटेलचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढला आहे. एकूणच बाजारात सर्वाधिक खरेदी ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्रात होते, तर विक्री मेटल आणि बँकिंग क्षेत्रात होते.

SCROLL FOR NEXT