Latest

हे कलाकार करणार गणरायाचं जल्लोषात स्वागत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३ या गणपती विशेष कार्यक्रमाची यंदाची थीम आहे आरती घराघरातली.

जी आरती आपण मनोभावाने म्हणतो ती आरती रचली कुणी आणि त्यामागची गोष्ट या कार्यक्रमातून दाखवण्यात येईल. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी या कार्यक्रमासाठी काही आरतींना नव्याने संगीतबद्ध केलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे स्पर्धक आणि प्रवाह परिवारातल्या कलाकारांनी मिळून बाप्पाच्या आरत्या नव्या अंदाजात सादर केल्या आहेत.

या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीय- मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक आणि अबोलीने. गणरायाच्या या जल्लोषात निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातली धमाल जुगलबंदी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT