पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत, ज्यांना आपल्याच फॅनशी प्रेम झालं…त्यांच्याशीच लग्न केलं (Star love with fan) आणि संसारही थाटला. असं म्हणतात की, जोड्या परमेश्वर बनवतो. बॉलीवूडचे अशा काही कपल्सची प्रेम कहाणी पाहून तुम्हालाही यावर विश्वास होईल. बॉलीवूडच्या असे काही स्टार्स आहेत, ज्यांना आपल्याच फॅनशी प्रेम झालं. केवळ फ्रेमच नाही तर स्टार्सनी त्यांच्याशी लग्नही केलं आणि संसारही थाटला. या यादीत शिल्पा शेट्टी ते विवेक ओबेरॉयपर्यंत सेलिब्रिटींचा समावेश आहे. (Star love with fan)
बिजनेसमन राज कुंद्रा लग्नाआधी शिल्पा शेट्टीचा जबरा फॅन होता. दोघांची पहिली भेट अमेरिकेत झाली होती. ज्यावेळी शिल्पा शेट्टीने बिग ब्रदर शोची ट्रॉफी जिंकली होती. मग, दोघांची मैत्री प्रेमात बदलली. अखेर राज-शिल्पाने नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न केले होते आणि दोघांची दोन मुलेही आहेत.
एका मुलाखतीत सायरा बानोने सांगितलं होतं की, त्यांना वयाच्या १२ वर्षांपासून दिलीप कुमार आवडायचे. लग्न करेन तर दिलीप कुमारशीचं, असे त्या म्हणायच्या. अखेर दोघांनी ११ ऑक्टोबर, १९६६ मध्ये लग्न केले होते.
तुषार कपूर आणि एकता कपूर यांची आई शोभा कपूर एअरहोस्टेस होत्या. पहिल्या भेटीत जितेंद्र आणि शोभा यांना प्रेम झालं होतं. तेव्हा शोभा १४ वर्षांच्या होत्या. त्यांना जितेंद्र आवडायचे. जितेंद्र यांचे नाव अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. पण, त्यांनी लग्न शोभा कपूरशीच केलं.
'जाने तू या जाने ना' चित्रपटातून पदार्पण करणारा इम्रान खान आणि अवंतिका हे घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. पण दोघांची लव्हस्टोरी खूप खास आहे. दोघांचे २०११ मध्ये लग्न झाले आणि दोघांना एक मुलगी इमारा आहे.
हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलची प्रेमकहाणीही अशीच आहे. तिचा पती भरत तख्तानी लग्नापूर्वी तिचा चाहता होता. २०१२मध्ये दोघांनी लग्न केले.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या वयात १५ वर्षांचे अंतर होते. एक काळ असा होता जेव्हा करोडो मुली राजेश खन्नावर फिदा होत्या. त्यापैकी एक होती डिंपल कपाडिया. डिंपव १६ वर्षांच्या असताना राजेश खन्ना यांनी प्रपोज केलं होतं आणि नात्याला डिंपल यांनी होकार दिला होता.
विवेक ओबेरॉयची पत्नी प्रियांका त्याच्या कामाची आणि अभिनयाची खूप मोठी फॅन आहे. दोघांनी २०१० मध्ये लग्न केले. प्रियांका ही कर्नाटकचे माजी मंत्री दिवंगत जीवराज अल्वा यांची मुलगी आहे.