Latest

Comedian Vidushi Swaroop : विदुषीचे बेताल वक्तव्य, ‘वेश्या व्यवसाय स्टार्टअप कुठेही उघडू शकता’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाई डेस्क : अनेक स्टँडअप कॉमेडियन्सची शोमध्ये जीभ घसरली आहे. त्यांच्या बेतला वक्तव्यामुळे त्यांना जाहीर माफीदेखील मागावी लागली आहे. (Comedian Vidushi Swaroop) आता स्टँडअप कॉमेडियन विदुषी स्वरुपनेदेखील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ती चांगलीच ट्रोल होत आहे. वेश्या व्यवसायावरून तिने केलेल्या वक्तव्यावरून तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Comedian Vidushi Swaroop)

संबंधित बातम्या –

काय म्हणाली विदुषी?

"मला वेश्याव्यवसाय जगातीला सर्वात कूल व्यवसाय वाटतो. येथे अनुभवाच्या नावावर कोणताही भेदभाव केला जात नाही. त्यांना फ्रेशर्स हवे असतात. ते ब्लॅकमध्ये कच्च्या कळ्या मागवत आहेत. जिथे इंटर्नची कमाई सीईओपेक्षा अधिक असते. इंटर्नला दुबईच्या शेखासह बिझनेस ट्रीप मिळतात आणि नको असलेला गरोदरपणाही मिळतो. हा असा व्यवसाय आहे ज्याचे तुम्ही कुठेही स्टार्टअप उघडू शकता. तसेच गुंतवणूकही शून्य आहे. आता काळाबरोबर वेश्याव्यवसाय सोपा झाला आहे. आमच्यावेळी असं नव्हतं."

तिच्या या विधानावरून नेटकरी संतापले आहेत. नेटकऱ्यांनी एक्सवर (ट्विट) एकामागून एक कॉमेंट करत तिला फटकारले आहे. अनेकांनी तिला आई-वडिलांकडून असले संस्कार मिळाले आहेत का, असा प्रश्न विचारला आहे. तर वेश्यांच्या नरक यातना काय असतात, माहिती आहे का, असाही प्रश्न तिला विचारण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT