Latest

एसटी कामगार संघटनेचा ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवादरम्यान कोकणात जादा वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज होत असतानाच एसटीचे कर्मचारी संप करण्याची शक्यता आहे.

प्रलंबित मागण्यांकरिता एसटी कामगार संघटनेने 11 सप्टेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवात एसटीची राज्यातील वाहतूक विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी 2016 ते 2020 या कालावधीतील 4,849 कोटींची एकतर्फी पगारवाढ घोषित केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT