Latest

S S Rajamouli : ‘जमीन हादरली, आम्ही २८ व्या मजल्यावर होतो’, जपानमधील भूकंपात एसएस राजामौली बचावले

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस एस राजामौली आणि त्यांचा मुलगा एस एस कार्तिकेय जपानमध्ये आलेल्या भूकंपात थोडक्यात बचावले. (S S Rajamouli ) गुरुवार, २१ मार्च रोजी जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ५.३ रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता होती. एस एस कार्तिकेयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने आपल्या स्मार्टवॉचमध्ये भूकंप अलर्ट दाखवलं आणि काही वेळातच ५.३ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. राजामौली यांच्या मुलाने सांगितले की, ज्यावेळी भूकंप आला तिथे त्यावेळी RRR ची संपूर्ण टीम इमारतीच्या २८ व्या मजल्यावर होती. (S S Rajamouli )

SS Karthikeya ने X वर फोटो शेअर करत लिहिले, 'आता-आता जपानमध्ये शक्तीशाली भूकंपाचा धक्का जाणवला. आम्ही २८ व्या मजल्यावर होतो. जमीन हळूहळू हादरू लागली. आम्हीला हे जाणवू लागले की, येथे भूकंप आहे. मी भीतीने आरडाओरडा करणार होतो. पण, आमच्या आसपास जे जपानी लोक होते, त्यांना फरक पडला नाही. ते अशा प्रकारे प्रतिक्रिया देत होते, जसे की पाऊस होणार आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT