पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बाहुबली: क्राऊन ऑफ ब्लड'चे प्रोडक्शन ग्राफिक इंडिया आणि आर्का मीडियावर्क्स प्रोडक्शनने केलं आहे. एस. एस. राजामौली आणि शरद देवराजन, शोबु यार्लागड्डा यांचे सादरीकरण आहे. या सीरीजचे स्ट्रीमिंग १७ मे, २०२४ पासून डिज्नी+हॉटस्टारवर होईल. बाहुबलीची टीम हैदराबादमध्ये पोहोचली. यावेळी एस एस राजामौली यांनी बाहुबली संदर्भात मोठे अपडेट दिले. डिज्नी+ हॉटस्टारने हैदराबादमध्ये आगामी ॲनिमेटेड सीरीज बाहुबली: क्राऊन ऑफ ब्लड वरून पडदा हटवला. आगामी ॲनिमेटेड सीरीज तुम्हाला साम्राज्यांची टक्कर आणि एक शाही प्रवासावर घेऊन जाणार आहे. या सीरीजमध्ये बाहुबली आणि भल्लालदेव सर्वांत मोठ्या धोक्यापासून माहिष्मती सारख्या महान साम्राज्य आणि त्याची सत्ता वाचवण्यासाठी एकत्र येतात. सीरीजचे दिग्दर्शन जीवन जे. कांग आणि नवीन जॉन यांनी केले आहे.
एस. एस. राजामौली म्हणाले, '' माझ्या मनात हैदराबाद विषयी एक खास जागा आहे. बाहुबली फ्रँचायजी या शहरात तयार झाला होता. 'बाहुबली: क्राऊन ऑफ ब्लड' सोबत बाहुबलीच्या नव्या कहाणीवरून पडदा हटवण्यासाठी हैदराबादमध्ये येऊन खूप चांगलं वाटत आहे.
बाहुबली: क्राउन ऑफ ब्लडचे लेखक – निर्माते शरद देवराजन म्हणाले, ''बाहुबली : क्राउन ऑफ ब्लडचे ग्राफिक भारतात बनवणे आमच्यासाठी एक खूप सुंदर प्रवास ठरला आहे. जेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट सुरु केला होता, तेव्हा आम्हाला जाणीव होती की, आमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. आम्हाला अशी ॲनिमेटेड सीरीज बनवायची होती, जी बाहुबली फ्रेंचायजीसारखी असेल. एस.एस. राजामौली सारख्या दूरदर्शी चित्रपट निर्मात्यासोबत काम करणे सन्मानाची बाब होती. यामध्ये माहिष्मतीची समोर न आलेया कहाण्या आणि छुपे रहस्य असतील.''
बाहुबलीचा आवाज देणारा अभिनेता शरद केळकर म्हणाला, ''मी अनेक पात्रांना माझा आवाज दिला आहे. पण, बाहुबली: क्राऊन ऑफ ब्लडची माझ्या मनात एक खास जागा आहे. मी या फ्रेंचायजीसोबत खूप दीर्घकाळ जोडलो गेलो आहे. या पात्राला माझा आवाज देणे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे. मला वाटलं की, मी एका नव्या जगात पाऊल ठेवत आहे!''
video – musafirfirasti insta वरून साभार