Latest

SRH vs CSK : चेन्नईचे हैदराबादला 166 धावांचे आव्हान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवम दुबेच्या 35 आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या नाबाद 31 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

चेन्नईची खराब सुरूवात

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने संघाला पहिले यश मिळवून दिले. चौथे षटक टाकायला आलेल्या भुवनेश्वरने रचिन रवींद्रला झेलबाद केले. रचिन नऊ चेंडूत 12 धावा करून बाद झाला. यापूर्वी सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने रचिनसह संघाला वेगवान सुरुवात करून दिली होती, मात्र भुवनेश्वरने ही भागीदारी संपुष्टात आणली.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सुरुवातीच्या धक्क्यानंतर संघाच्या डावाची धुरा सांभाळली. त्याने अजिंक्य रहाणेच्या साथीने डाव पुढे नेत पॉवरप्लेच्या शेवटपर्यंत हैदराबादला दुसरे यश मिळवू दिले नाही. मात्र, जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असलेल्या सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनेही आठव्या षटकात आपली विकेट गमावली. शाहबाज अहमदने गायकवाडला आपला बळी बनवले. गायकवाड 21 चेंडूत 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

शिवम दुबेने सावरला चेन्नईचा डाव

यानंतर शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सीएसकेच्या डावाची धुरा सांभाळली. रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांना बाद झाल्यानंतर शिवमने डाव सावरत शाहबाज अहमद आणि मयंक मार्कंडे यांच्यावर निशाणा साधला. शिवमच्या झटपट खेळीमुळे सीएसकेने नऊ षटकांअखेर दोन बाद 80 धावा केल्या. गायकवाड बाद झाल्यानंतर शिवम मैदानात आला आणि उतरताच त्याने शाहबाज अहमदवर एक षटकार आणि चौकार लगावला.

यानंतर पुढचे षटक टाकण्यासाठी आलेल्या मयंकचेही चौकार मारून स्वागत करण्यात आले. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संथ सुरुवातीपासून सावरत शिवम दुबेने वेगवान खेळ सुरूच ठेवला. शिवम आणि रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

कमिन्स फोडली भागिदारी

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सीएसकेचा युवा फलंदाज शिवम दुबेला बाद करून संघाला तिसरे यश मिळवून दिले. शिवम 24 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने सीएसकेला चौथा धक्का दिला. यानंतर चेन्नईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे 30 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे सनरायझर्सने सीएसकेचा डाव डळमळीत केला. चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघाचा डाव सांभाळला. जडेजाने वेगवान खेळ करत सीएसकेची धावसंख्या 150 च्या पुढे नेली, पण 20 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टी नटराजनच्या चेंडूवर डॅरिल मिशेलने आपली विकेट गमावली. मिशेलने 11 चेंडूत 13 धावा केल्या.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT