Latest

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्‍त दिव्यांगांनी १.२५ किमी लांब वाढदिवस कार्ड केले तयार

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) च्या 400 अंध मुलांनी हातात 1.25 किमी लांबीचे अभिनंदन कार्ड घेऊन पदयात्रा काढली. ज्यात पंतप्रधानांनी केलेल्या 9 वर्षांच्या प्रशंसनीय कार्याचा समावेश आहे. प्रेमाचे हे प्रतीक बनवण्यासाठी आणि सादर करण्यासाठी त्यांना 2 महिन्यांची मेहनत लागली.

यावेळी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अध्यक्ष राजेश सिंग दयाळ म्हणाले की, पंतप्रधानांप्रती मुलांचे प्रेम आणि आपुलकी हेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग दृष्टीहीन मुलांनी 1.25 किमी लांबीचे सादरीकरण केले.

या कार्यक्रमात दिव्यांग मुलांनी पंतप्रधानांना समर्पित केलेल्या गीताचे सादरीकरण मन मोहून टाकणारे होते. मुलांच्या सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. बदलते हवामान आणि पाऊसही दिव्यांग मुलांचे भावविश्व थांबवू शकले नाहीत.

आज शेकडो दृष्टिहीन मुलांनी बनवलेल्या या अभिनंदन पत्राच्या अनावरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि गोमती नगर, लखनौ येथील दयाल चौराहा येथून सुरुवात झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT