Latest

Pollution Control : प्रदूषण नियंत्रणात श्रेणीबद्ध उपाययोजनांच्या चौथ्या टप्प्याच्या निरीक्षणासाठी विशेष टास्क फोर्स

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसात राजधानी दिल्लीतील प्रदूषण काही केल्या कमी होताना दिसत नाही. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, श्रेणीबद्ध उपाययोजनांचा चौथा टप्पा लागु आहे, त्याचे निरीक्षण करण्यासाठी ६ सदस्यीय विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे,  दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी तशी माहिती दिली आहे.

प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना कृत्रिम पाऊस पाडता येईल का यासंदर्भातही चाचपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, "सध्याच्या परिस्थितीनुसार पुढील २-३ दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक 'अत्यंत खराब' श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारच्या अंदाजानुसार, वाऱ्याचा वेग कमी राहु शकतो. जोपर्यंत वाऱ्याचा वेग वाढणार नाही तोपर्यंत हवा गुणवत्ता निर्देशांक 'अत्यंत खराब' श्रेणीत राहील. या पार्श्वभुमीवर एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रेणीबद्ध उपाययोजनांच्या चौथ्या टप्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ६ सदस्यीय विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, पर्यावरण विभागाचे विशेष सचिव हे या टास्क फोर्सचे प्रभारी असणार आहेत

SCROLL FOR NEXT