Latest

संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष; रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र

निलेश पोतदार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी सुमारे 54 टक्के मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी 75 टक्क्यांवर नेण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला आहे.

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 63 तर नागपूरमध्ये 61 केंद्रे आहेत. यात काटोल 15, सावनेर 11, हिंगणा 7, उमरेड 13, कामठी 7 तर रामटेकमध्ये 10 संवेदशील मतदान केंद्रे आहेत. नागपूर लोकसभेंतर्गत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 11, नागपूर दक्षिण 11, नागपूर पूर्व 10, नागपूर मध्य 8, नागपूर पश्चिम 9, नागपूर उत्तर 12 अशा एकूण 61 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

या केंद्रांवर विशेष लक्ष असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. 50 टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे. रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात एकूण 4510 मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे आहेत. मतदान पथकांसोबत प्राथमिक वैद्यकीय किट, ग्लुकोज असणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांची यासाठी मदत घेतली जात आहे.

12 महिला मतदान केंद्र

दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 12 महिला मतदान केंद्र आहेत. नागपूर लोकसभेसाठी 321 पोलिस अधिकारी, 4 हजार 250 पोलिस कर्मचारी आणि 1 हजार 800 होमगार्डस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात आहेत. रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथक तैनात आहेत.

देवलापार येथे आदिवासी मतदार केंद्र

रामटेक लोकसभा मतदारसंघात देवलापार येथे आदिवासी मतदान केंद्र असणार आहे. मतदान सुरू होताच सुरुवातीच्या मतदारांचे पारंपरिक आदिवासी पद्धतीने स्वागत करण्यात आले. यासोबतच दिव्यांग, युवा अशी विशेष मतदान केंद्रे लक्षवेधी ठरली. दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT