Latest

South Africa VS India T 20I : बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : South Africa VS India T 20I दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित T20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने म्हटले आहे.

South Africa VS India T 20I  याबाबत बीसीसीआई ने म्हटले आहे, "अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने मोहम्मद सिराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी अस्वस्थ जसप्रीत बुमराह याच्या जागी टीममध्ये समावेश केले आहे. बुमराहला पाठीत लागले आहे आणि तो सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या निगरानीत आहे." सीरीजच्या दोन उरलेल्या मॅच गुवाहाटीमध्ये 2 ऑक्टोबरला आणि इंदौरमध्ये चार ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.

जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात खेळला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून त्याने पुनरागमन केले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेशिवाय तो आशिया कपमध्ये खेळू शकला नाही.

South Africa VS India T 20I  बुमराह टी 20 विश्व चषकातूनही बाहेर?

बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देऊन पीटीआई या वृत्त एजन्सीने माहिती दिली आहे की बुमराह हा फक्त दक्षिण आफ्रिकाच नाही तर टी 20 विश्व चषकातूनही बाहेर पडला आहे. बीसीसीआईने मात्र याचे अधिकृत वृत्त जाहीर केलेले नाही. पीटीआईने दिललेल्या वृत्तानुसार बुमराहची कोणतीही सर्जरी होणार नाही. मात्र तो क्रिकेटपासून 4 ते 6 महिने दूर राहू शकतो.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.

हे ही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT