Latest

IND vs SA Series : द. आफ्रिका संघाची घोषणा, मार्कराम कर्णधार; बावुमाची टी-20-वनडेतून उचलबांगडी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA Series : दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर आफ्रिकन संघाने अनेक बदल केले आहेत. संघाचा कर्णधार टेंबा बावुमाचा टी-20 आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यांच्या जागी एडन मार्करामकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पण कसोटी संघाचा कर्णधार बावुमाच असणार आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या अधिकृत 'X' अकौंटवर संघाची घोषणा करताना सांगितले की, 'कर्णधार टेंबा बावुमा आणि कागिसो रबाडा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आले आहे, जेणेकरून हे खेळाडू लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करू शकतील. नुकत्याच संपलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिका संघाने चांगली कामगिरी केली. पण उपांत्य फेरीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. असे असले तरी आमचा संघ नाउमेद झालेला नाही. अगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला डोळ्यासमोर ठेवून आम्ही तयारीला लागलो आहे. त्यानुसार संघ बांधणीसाठी आम्ही कंबर कसली आहे. याचा सकारात्मक परिणाम भारताविरुद्धच्या मालिकेमध्ये दिसून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.'

द. आफ्रिकेचा कसोटी संघ :

टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नॅंद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरिन.

द. आफ्रिका टी-20 संघ

एडन मार्कराम (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नॅंद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी (पहिला आणि दुसरा टी20 सामना), डोनोव्हन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन (पहिला आणि दुसरा टी20 सामना), हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी (पहिला आणि दुसरा टी20 सामना), अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विल्यम्स.

द. आफ्रिकेचा वनडे संघ

एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नॅंद्रे बर्जर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, काइल वेरिन, लिझाद विल्यम्स.

भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-20 मालिका

पहिला T20 सामना : 10 डिसेंबर (डरबन, रात्री 9.30 वा.)
दुसरा टी-20 सामना : 12 डिसेंबर (गाकेबरहा, रात्री 9.30 वा.)
तिसरा टी-20 सामना : 14 डिसेंबर (जोहान्सबर्ग, रात्री 9.30 वा.)

भारत विरुद्ध द. आफ्रिका वनडे मालिका

पहली वनडे : 17 डिसेंबर (जोहान्सबर्ग, दुपारी 1.30 वा.)
दुसरी वनडे : 19 डिसेंबर (गाकेबरहा, दुपारी 4.30 वा.)
तीसरी वनडे : 21 डिसेंबर (पार्ल, दुपारी 4.30 वा.)

भारत विरुद्ध द. आफ्रिका टेस्ट मालिका

पहली कसोटी : 26 ते 30 डिसेंबर (सेंचुरियन, दुपारी 1.30 वा.)
दुसरा कसोटी : 3 ते 7 जानेवारी (केपटाउन, दुपारी 2 वा.)

SCROLL FOR NEXT