पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ फिल्म स्टार अभिनेता धनुष आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हीने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साऊथसह फिल्म जगतात जोरदार चर्चा सुरू आहे. ऐश्वर्या आणि धनुष हे १८ वर्षे एकत्र राहत होते. ऐश्वर्या साऊथ सुपरस्टार रजनीकांतची मुलगी आहे. धनुष आणि रजनीकांत यांचे फिल्म जगतात नाव असल्याने याची जोरदार चर्चा होत आहे. (South Actors)
साऊथमध्ये धनुष आणि ऐश्वर्या यांच्यासह साऊथच्या अन्य अभिनेते आणि अभिनेत्रींनी सोडचिट्टी घेतले आहे. लग्ण जमल्यापासून ३ वर्षे ते १८ वर्षे संसार केलेले सुपरस्टार असल्याचे समोर आले आहे.
२०१७ मध्ये विवाह बंधनात अडकलेले समंथा आणि नागा चैतन्य यांनी चार वर्षांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये सोशल मीडियावर एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली. या दोन कलाकारांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होण्याच्या चार दिवस आधीच वेगळे होण्याची घोषणा केली. यांच्यातील सोडचीट्टीवरून बरेच दिवस वाद सुरू होता. त्यानंतर समंथा पुष्पा चित्रपटात आयटम साँगमध्ये दिसली होती.
नागार्जुन-लक्ष्मी दग्गुबती
साऊथ सुपरस्टार नागार्जुनचेही लग्न १९९० मध्ये मोडले होते. १९८४ मध्ये नागार्जुनने लक्ष्मी दग्गुबतीशी लग्न झाले होते. त्यांच्यात सहा वर्षाचा सहवास लाभला त्यांनी १९९० मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर काही काळाने नागार्जुन आणि अमला यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. १९९२ साली त्यांनी दुसरे लग्न करण्याची निर्णय घेतला. मागच्या वर्षी नागार्जुनचा मुलगा नागाचैतन्याचे ही लग्न मोडले होते.
सौंदर्या-अश्विन रामकुमार
ऐश्वर्या रजनीकांतची बहीण सौंदर्या हिचे लग्नही एकदा मोडले आहे. मात्र, नंतर तीने दुसरे लग्न केले. रजनीकांत यांची दुसरी मुलगी सौंदर्याने २०१६ मध्ये अश्विन रामकुमारसोबत परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता.
प्रभु देवा- रामलता
अभिनेता प्रभू देवाने १९९५ मध्ये रामलताशी लग्न केले, तर २०११ मध्ये त्यांचे आणि पत्नीमध्ये काही कारणास्तव वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. काहीवर्षानंतर प्रभू देवा नयनताराला डेट करत होता. दरम्यान त्यांच्यातही ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.
प्रकाश राज-ललिता कुमारी
दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी १९९४ मध्ये ललिता कुमारीसोबत लग्न केले. १५ वर्षे टिकलेले हे नाते २००९ मध्ये या नात्यात दुरावा आला. प्रकाश राज यांनी नंतर दुसरे लग्नही केले. कोरिओग्राफर पोनी वर्मा त्यांची दुसरी पत्नी आहे.
पवन कल्याण-रेनू
तीन वर्षांच्या वैवाहिक जीवनात दोन मुलांचा बाप झालेला अभिनेता पवन कल्याणने २०१२ मध्ये रेणू हिला घटस्फोट दिला. याआधी १९९७ मध्ये त्याने नंदिनीसोबत लग्न केले होते, २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.