Latest

Varun-Lavanya Tripathi Engagement : वरुण- लावण्याचा पार पडला साखरपुडा; बड्या स्टार्सनी लावली हजेरी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अंतरीक्षम' फेम साऊथ अभिनेता वरुण तेज आणि अभिनेत्री लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा नुकताच मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे. काल म्हणजे, शुक्रवारी ( ९ जून ) रोजी वरुणच्या हैदराबाद येथील घरी काही मोजक्याच नातेवाईकाच्या उपस्थितीत साखरपुडा ( Varun-Lavanya Tripathi Engagement ) संपन्न झाला. या कार्यक्रमाला वरुणचा चुलत भाऊ साऊथ स्टार अल्लू अर्जुन, राम चरण आणि सुपरस्टार चिरंजीवी याच्यासह अनेकांनी हजेर लावली होती.

वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीने त्याच्या इन्स्टाग्रामव अकाऊंटवर एक फोटो शेअर साखरपुडा ( Varun-Lavanya Tripathi Engagement ) झाल्याची माहिती दिली आहे. यातील पहिल्या फोटोत वरुण आणि लावण्या एकमेकांसोबत हसताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत दोघांच्या हातात एगेंजमेंट रिंग्स फ्लॉन्ट केल्याचे दिसतेय. यावरून दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या फोटोला दोघांना 'Found my Lav!♥️', '2016♾️❤️Found my foreve'. अशी कॅप्शन लिहिली आहे.

या खास साखरपुड्यासाठी लावण्‍याने पारंपारिक लूक कॅरी केला आहे. लाईट ग्रीन कलरच्या बनारसी साडीवर गोल्डन एम्ब्रॉयडरी लावण्‍यावर खुलून दिसत होती. या साडीसोबत तिने मॅचिंग नेकलेस, लूज बन हेयर स्टाईल, केसात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, इअररिग्स आणि बांगड्या परिधान केल्या होत्या. तर वरुण ऑफ व्हाइट कुर्ता आणि पायजमामध्ये हँडसम दिसत होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सनी दोघांच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, एंगेजमेंटच्या काही दिवसआधी वरुणच्या आगामी तेलुगू 'गंदीवाधारी अर्जुन' चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली होती. त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले होते की, 'वादळापूर्वीची शांतता. २५ ऑगस्टसाठी लॉक आणि लोड केलेय! लवकरच चित्रपटगृहात भेटू.#GandivadhariArjun.' असे लिहिले आहे. तर लावण्या तेलुगू 'पुली मेका' या वेबसीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या वेबसीरिजमध्ये ती पोलिसाच्या भूमिकेत दिसली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT