Latest

सोनाक्षीने गिरवला प्रियांका-तब्बूचा कित्ता!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : सोनाक्षी सिन्हाचा ( Sonakshi Sinha ) 'दहाड' ही वेबसीरिज दोनच दिवसांपूर्वी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाली असून सोनाक्षीने यात पोलिस अधिकार्‍याचा रोल केला आहे. अर्थात, पोलिसांची भूमिका साकारणारी सोनाक्षी ही पहिलीवहिली अभिनेत्री अजिबात नसून यापूर्वी प्रियांका चोप्रापासून तब्बूपर्यंत अनेक अभिनेत्रींनी यात आपले नशीब आजमावले आहे.

नेटफ्लिक्सवर असलेल्या 'डॉन 2' चित्रपटात प्रियांका चोप्राने पोलिस अधिकार्‍याची भूमिका साकारली. त्यापूर्वी, माधुरी दीक्षितने सुभाष घईंच्या 'खलनायक' चित्रपटात इन्स्पेक्टर गंगा देवीचा रोल करत धमाल केली होती. माधुरीचा हा चित्रपट जी 5 वर उपलब्ध आहे. याशिवाय, ड्रीम गर्ल हेमा मालिनीने 1983 मध्ये प्रदर्शित 'अंधा कानून' चित्रपटात, तर राणी मुखर्जीने प्राईम व्हिडीओवर उपलब्ध असलेल्या 'मर्दानी' चित्रपटात पोलिस अधिकार्‍याची भूमिका साकारली.

याशिवाय, 2015 मध्ये प्रदर्शित 'द़ृश्यम' चित्रपटात आयजी मीरा देशमुखची व्यक्तिरेखा साकारणार्‍या तब्बूने अगदी अजय देवगणला टक्कर देण्यात थोडीही कसर सोडली नव्हती. ओटीटी यूजर्ससाठी हा चित्रपट डिस्ने-हॉटस्टारवर उपलब्ध आहे. 'दहाड' मधील सोनाक्षीच्या ( Sonakshi Sinha ) रोलमुळे या सार्‍या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

SCROLL FOR NEXT