Latest

KL Rahul-Athiya Wedding : केएल राहुल-अथियाच्या लग्नाचे फोटो आले समोर (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाह बंधनात ( KL Rahul-Athiya Wedding ) अडकले. यानंतर दोघांच्या चाहत्यांनी कपलचे क्यूट फोटो पाहण्यास उत्सुकता शिगेला पोहोचली होती. याच दरम्यान अथियाने सोशल मीडियावर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री अथिया शेट्टीने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर लग्नातील काही विधी आणि कार्यक्रामाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अथिया आणि राहुल नववधु-वरांच्या वेशभुषेत एकदम हटके दिसत आहेत. लग्नात अथियाने पिस्टल पिंक कलरचा लेहंगा तर राहुलने मॅचिंग कलरची शेरवानी परिधान केली होती. या वेशभूषेत कपल क्यूट आणि ग्लॅमरस दिसते आहे. यावेळी राहुल-अथिया दोघेजण एकमेंकाच्या हाहात-हात धरून साक फेरे घेताना दिसत आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "In your light, I learn how to love…" ♥️,Today, with our most loved ones, we got married in the home that's given us immense joy and serenity. With a heart full of gratitude and love, we seek your blessings on this journey of togetherness. ??'. असे लिहिले आहे. यानंतर चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.

याआधी लग्नाची माहिती सोशल मीडियावर मिळालेली नव्हती. मात्र, अजय देवगण आणि संजय दत्त यांच्या पोस्टमुळे लग्न सोहळा पार पडल्याचे स्पष्ट झाले. यानंतर दो्ही कुटुंबीयांकडून कोणतेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले नाहीत. शेवटी अथियाने लग्नाची माहिती शेअर केली आहे. ( KL Rahul-Athiya Wedding )

हेही वाचलंत का? 

(photo,video : viralbhayani instagram वरून साभार)

SCROLL FOR NEXT