Latest

Surya Grahan 2022 : 30 एप्रिलला होणारे सूर्यग्रहण, कुठे, कधी आणि कसे पाहता येईल?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : २०२२ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे शनिवारी (दि.30) दिसणार आहे. यावेळी चंद्राचे प्रतिबिंब हे सूर्यावर पडणार असून, सूर्याचा ६४ टक्के भाग हा चंद्रामुळे झाकाळला जाणार आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, सूर्यग्रहणामुळे  सूर्याचा ६४ टक्के भाग चंद्राच्या सावलीने झाकाळला जाणार आहे. हे ग्रहण पृथ्वीवरील काही भागात अंशतःच दिसणार आहे. या ग्रहणामुळे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ दिशेत राहणार नाहीत. त्यामुळे चंद्राच्या बाहेरच्या भागाची सावली फक्त सूर्यावरच पडणार आहे. या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण हे २५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचेही नासाने सांगितले आहे.

नेमके सूर्यग्रहण कधी दिसेल

या वर्षातील हे पहिलेच सूर्यग्रहण शनिवारी (दि. 30) दिसणार आहे. हे ग्रहण मध्यरात्री १२.१५ पासून सुरू होईल आणि पहाटे ०४.०७ पर्यंत असणार आहे. हे सूर्यग्रहण आंशिक स्वरुपाचे असेल म्हणजेच सूर्याचा केवळ ६४ टक्के भाग हा चंद्राच्या सावलीने व्यापलेला असेल.

कुठे दिसणार हे ग्रहण

30 एप्रिल रोजी होणारे हे सूर्यग्रहण अंटार्क्टिका व्यतिरिक्त अटलांटिक प्रदेश, प्रशांत महासागर आणि दक्षिण अमेरिकेच्या नैऋत्य भागात दिसणार आहे. म्हणजेच चिली, अर्जेंटिना, पेरू, उरुग्वे, पश्चिम पॅराग्वे, नैऋत्य बोलिव्हिया, आग्नेय पेरू आणि ब्राझीलचा काही भाग दक्षिण अमेरिकेतही हे ग्रहण दिसणार आहे. पण हे सूर्यग्रहण भारतात भारतात मात्र दिसणार नाही.

दुसरे सूर्यग्रहण, मात्र भारतात दिसणार

या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण हे २५ ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी हे ग्रहण संध्याकाळी ०४.३० ते ०५.४२ पर्यंत असणार आहे. हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा उत्तर-पूर्व भाग, आशियाचा नैऋत्य भाग आणि अटलांटिक महाद्वीपमध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारताच्या काही भागात दिसणार आहे, त्यामुळे देशात सुतक कालावधी वैध असेल.

SCROLL FOR NEXT