पुढारी ऑनलाईन डेस्क : देशामध्ये सॉफ्टवेअर मध्ये बलाढ्य अशी कंपनी असणाऱ्या इन्फोसिस कंपनीनेही चालू महिन्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. 'मूनलाइटिंग' Moonlighting या प्रकरणामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचे कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी सांगितले आहे. त्यांनी यावेळी कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या घोषित केली नसली तरी 'विप्रो' प्रमाणे ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. 'विप्रो' या कंपनीनेही गेल्या काही आठवड्यांपूर्वी तीनशेहुन अधिक कर्मचाऱ्यांना 'मूनलाइटिंग' Moonlighting प्रकरणी कामावरून कमी केले होते.
एका कंपनीत कार्यरत असताना पुन्हा त्याच्या प्रतिस्पर्धी कंपनीत देखिल काम करणे याला कंपनीच्या भाषेत 'मूनलाइटिंग' असे म्हणतात. भारतातील अनेक कंपन्यांनी याला मनाई केली आहे. तर स्विगी सारख्या काही कंपन्या कर्मचा-यांच्या आर्थिक फायद्यासाठी दुसरा जॉब करण्याची परवानगी देतात आणि याचे समर्थन देखिल करतात.
दरम्यान, इन्फोसिस कर्मचाऱ्यांना बाहेरचे काही प्रोजेक्ट्स घेण्याची परवानगी देणारी योजना आणत असून एक्सलेरेट Accelerat अशी ही योजना असणार असल्याचे पारेख यांनी सांगितले आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या टॅलेंटची पर्वा करतो त्याचमुळे आम्ही अशा प्रकारची अधिक व्यापक धोरणे विकसित करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. ही एक गोपनीय गोष्ट राहणार असून त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. सध्या इन्फोसिसने १०३२ कर्मचाऱ्यांची भरती केली असून एकूण ३. ४ लाख कर्मचारी कंपनीसाठी काम करत आहेत.
हे वाचलंत का?