Latest

‘या’ चुका करु नका, अन्‍यथा तुमच्या मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊ शकतो

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्मार्ट फोन हा आता आपल्‍या जगण्‍यातील अविभाज्य भाग बनलायं; मग ते कॉल करणे असो, इंटरनेट वापरणे असो, पेमेंट करणे असो किंवा मेल पाठवणे. आपली सर्व कामे ही  स्मार्ट फोनवर अवलंबून आहेत. अनेकवेळा असे देखील घडते की, आपला मोबाईल जास्त गरम हाेताे. फाेन जास्त गरम होणे योग्य नाही. कारण आपल्याला माहित आहे का ? फाेन जास्‍त गरम झाल्यामुळे अनेकवेळा फाेनमधील बॅटरीचा स्फोट होतो. हे टाळायचे असेल तर जाणून घ्‍या खालील टीप्‍स…

मोबाईलला रात्रभर चार्जिंग करणे बंद करा

आपण आपला मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावतो. रात्री झोपण्यापूर्वी फोन चार्जवर ठेवून झोपतो आणि नंतर फाेन रात्रभर चार्जिंगवर राहतो. असं केल्याने, जास्तवेळ फोनची बॅटरीच नाही तर उपकरणालाही त्या उष्णतेचा त्रास होऊ लागतो. अशीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात फोनची बॅटरी ओव्हरचार्जिंगमुळे स्फोट झाले आहेत.

चार्जिंग केबल

काही थर्ड-पार्टी बॅटरी आणि चार्जर आहेत जे स्मार्टफोन गरम होण्याचे कारण बनतात. केवळ बॅटरीच नाही तर वेगवेगळ्या वॅट्सचा चार्जर, जो मोबाईल आहे त्याच वॅटचा चार्जर आहे का? याची काळजी घ्या. म्हणजेच ज्या मोबाईलचा चार्जर आहे तोच वापरा. चुकीचा चार्जर वापरणे हेही फोन गरम होण्याचे मुख्य कारण आहे.

मोबाईल पूर्ण चार्ज करू नका

मोबाईल कधीही फुल चार्ज होण्यापर्यंत चार्ज करू नका म्हणजेच १०० टक्के, शक्य असल्यास फोनची बॅटरी ९० टक्क्यांपर्यंत ठेवा आणि एक गोष्ट जी नेहमी लक्षात ठेवा की, फोनची बॅटरी २० टक्क्यांपेक्षा कमी घेऊ नये. मोबाईल वारंवार चार्ज केल्याने देखील फाेनची बॅटरी गरम हाेते.  त्‍याच परिणाम बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होतो.

ओरिजनल चार्जर आणि USB आवश्यक

तुमच्या मोबाईलसोबत आलेला चार्जर किंवा USB केबल तुटली किंवा खराब झाली तर आपल्यााला वाटते जास्त पैसे देऊन ओरिजनल का घ्यायची. डुप्लिकेट किंवा लोकल चार्जर किंवा USB केबल घेऊ; पण तसं करु नका. मोबाईलला डुप्लिकेट चार्ज केल्यामुळे अनेक वेळा स्मार्टफोन ओवरहीटिंग होण्याची समस्या सुरू होते. स्लो चार्जिंग होऊन बॅटरी फुटण्याची भीतीही असते.

अतिरिक्‍त ॲप्‍समुळेही डिव्हाइस हाेताे गरम

काही मोबाईल ॲप्सदेखील आहेत जे फोनचे ग्राफिक्स आणि प्रोसेसिंग पॉवर या दोन्हींवर परिणाम करतात. ज्यामुळे डिव्हाइस गरम होताे. काही ॲप्स फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सुरुच राहतात. ज्यामुळे फोनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो आणि काहीवेळा परिस्थिती अशी होते की स्मार्टफोन गरम होऊ लागतो.

ॲपमुळेही मोबाईल गरम होतो

काही मोबाईल ॲपमुळे फोनच्‍या ग्राफिक्स आणि प्रोसेसिंग पॉवरवर परिणाम हाेताे.  ज्यामुळे डिव्हाइस गरम होताे. असे ॲप फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सुरु राहतात. ज्यामुळे मोबाईलच्या प्रोसेसिंगवरही परिणाम होतो. यामुळे मोबाईल गरम होऊ शकतो. त्‍यामुळेच असे ॲप इन्‍स्‍टाॅल करण्‍यापासून लांब राहावे.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT