Latest

‘स्मार्ट एसआयपी’

Arun Patil

स्मार्ट एसआयपीमध्ये ठरावीक रक्कम न करता मार्केटमधील बदलानुसार गुंतवणुकीमध्ये बदल होतो. म्हणजे मार्केट खाली असेल तर आपली गुंतवणूक वाढवली जाते. त्यामुळे आपल्याला युनिट जास्त मिळतात. दर वाढले असेल म्हणजे मार्केटमध्ये तेजी असेल, तर तिथे आपोआप आपली गुंतवणूक कमी होते. तिथे वाढीव दराने युनिट्स कमी मिळतात.

सेबीच्या आधिपत्याखाली म्युच्युअल फंड क्षेत्र मोठ्या जोमाने विस्तारत आहे. हे मागील दहा वर्षांचा आढावा पहिला की लक्षात येते. जून 2012 साली या क्षेत्रात एकूण गुंतवणूक मालमत्ता 6.89 लाख कोटी होती. आज ती पाच पटीने वाढून जून 2022 मध्ये ती 36.98 लाख कोटींवर पोहोचलेली आहे. विविध मालमत्तेत आपल्या गरजेनुसार सहजपणे गुंतवणूक करता येते, हे म्युच्युअल फंडाचे वैशिष्ट्य आहे. गेल्या वीस वर्षांत चांगला परतावा मिळाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत गेला. परिणामी, या क्षेत्राचा विस्तार प्रचंड पटीने वाढलेला पाहावयास मिळतो. आज दोन हजारांहून अधिक योजना उपलब्ध आहेत आणि एका दिवसापासून चाळीस-पन्नास वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. सुरक्षित गुंतवणूक, पारदर्शीपणा, सेबीचे कडक नियंत्रण, कमी खर्चात तज्ज्ञाकडून गुंतवणुकीचे उत्तम व्यवस्थापन ही आपल्या देशातील गुंतवणूक क्षेत्राची खासियत आहे.

देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली म्युच्युअल फंडात गुंतवणूक पद्धत म्हणजेच (एसआयपी) नियमित गुंतवणूक पद्धत होय. दरमहा आपल्या बँक खात्यामधून ठरावीक रक्कम कपात होऊन म्युच्युअल फंड योजनेमध्ये आपोआप गुंतवणूक करण्याची ही यंत्रणा आहे. या माध्यमातून आपण साडेपाच कोटी खातेदारांकडून दरमहा 12300/- रु. कोटी वर्षाला 1,50,000/- लाख कोटी गुंतवणूक होत आहे. इक्विटीमधील काही योजनांनी दीर्घकाळात 12% पासून 22% पर्यंत मागील वीस वर्षांत परतावा दिला आहे. जिथे महागाई 7% वाढली असली तरी त्यावर मात करून चांगली संपत्ती निर्माण झाली आहे. एसआयपीमध्ये चांगला परतावा मिळतो, याचे मूळ कारण आहे की, इथे रुपयाचे सरासरी मूल्यनियम काम करतो.

रूपी एव्हरेज कॉस्ट म्हणजेच रुपयाचे सरासरी मूल्य : हा नियम कसा काम करतो ते समजावून घेऊ. इक्विटी मार्केटचा अस्थिरता र्(ीेंश्ररींळश्रळीूं) हा मूळ स्वभाव आहे. मार्केट सतत खाली-वर, तेजी-मंदी होत असते. मंदीत शेअर्सचे दर खाली येतात अन् तेजीत शेअर्सच्या किमती वाढतात. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून जेव्हा आपण दरमहा गुंतवणूक करत असतो, तेव्हा आपली गुंतवणूक विविध अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये होत असते. ज्या-ज्यावेळी मार्केट खाली येत असते, त्यावेळी युनिटच्या किमती खाली येतात. तेव्हा मंदीत शेअर्सचे खाली असतात. त्यामुळे म्युच्युअल फंडातील युनिटचे दर कमी असतात. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीत जास्त युनिट्स मिळतात. तेजीत दर वाढलेले असतात, तेव्हा युनिट्स दर वाढलेले असलेने कमी युनिट्स मिळतात. त्यामुळे सरासरी खरेदी मूल्य कमी होते व कालांतराने मार्केट वर जाते तेव्हा फायदा निश्चित स्वरूपात मिळतो. याला रूपी आवरेजिंग कॉस्ट म्हणता येईल. रुपयाची सरासरी मूल्य चक्रवाढ व्याजाची ताकद हे दोन्ही नियमांचा संगम झाल्यामुळे एक चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी हा एक राजमार्ग आहे.

दर महिन्याला ठरावीक रक्कम गुंतवणूक करून त्या योजनेत त्या दिवशी असेल त्या दराने युनिटची खरेदी करत राहणे ही नार्मल एसआयपी झाली. सध्या स्मार्ट एसआयपी याहून चांगला परतावा मिळवून देते. स्मार्ट एसआयपी ही पद्धत कशी काम करते, ते पाहूया. या पद्धतीमध्ये ठरावीक रक्कम न करता मार्केटमधील बदलानुसार गुंतवणुकीमध्ये बदल होते. म्हणजे मार्केट खाली असेल तर आपली गुंतवणूक वाढवली जाते. त्यामुळे आपल्याला युनिट जास्त मिळतात. दर वाढले असेल म्हणजे मार्केटमध्ये तेजी असेल, तर तिथे आपोआप आपली गुंतवणूक कमी होते. तिथे वाढीव दराने युनिट्स कमी मिळतात. (तक्त्यामध्ये पाहावे.)

नॉर्मल एसआयपी

यामध्ये दरमहा 10000/- गुंतवणूक 14 महिन्यात एकूण गुंतवणूक 140000/- झाली असून, मार्केटच्या तेजी-मंदीनुसार सरासरी युनिट 48/- रु. खरेदीने एकूण युनिट 3064.98 मिळाले आहेत. जून 22 युनिट दर 67/- रु. झालेने सर्व युनिट्सचे गुंतवणूक एकूण मूल्य 205353.66 इतकी झाली आहे.

स्मार्ट एसआयपी

मध्ये मार्केट खाली गेल्यानंतर आपली रक्कम गुंतवणूक दुप्पट होते व मार्केटमध्ये तेजी आले की दर वाढले की, गुंतवणूक रक्कम तिथे निम्म्याने कमी होते. या पद्धतीने कोव्हिडच्या काळात मार्केट खाली आले होते, तेव्हा गुंतवणूक रक्कम दुप्पट झाली. जानेवारी 2022 मध्ये मार्केट वाढल्याने गुंतवणूक रक्कम दुप्पट निम्मी झाली. अशा पद्धतीने एकूण गुंतवणूक 205000/- झाली. त्याचे 4826.21 युनिटची खरेदी होऊन सरारी 48/- प्रमाणे होऊन गुंतवणुकीचे एकूण मूल्य 3,23,356.07/- इतकी रक्कम झालेली पाहावयास मिळते.

स्मार्ट एसआयपीमध्ये 65 हजार गुंतवणूक जादा केली व 118000/- रुपये जास्त मिळाली आहेत.कोटकच्या इमे इक्विटी योजनेत जानेवारी 2010 पासून दरमहा 10000/- प्रमाणे नार्मल एसआयपी आणि स्मार्ट एसआयपीद्वारे सुरू केले आहेत. जुलै 22 अखेर नॉर्मल 15.10 लाख गुंतवणुकीतून 53.38 इतके मूल्य झाले आहे. स्मार्ट एसआयपीमध्ये मार्केट खाली आले होते; तेव्हा गुंतवणूक रक्कम वाढविली गेल्याने 3,70,000/- इतकी जादा रक्कम गुंतवणूक झाली म्हणजेच एकूण 18.88 लाख गुंतवणूक झाली, त्याचे मूल्य 80.70 लाख इतकी झाली आहे. 3,70,000 जादा रक्कम भरून 26.90 लाख इतकी जादा रक्कम मिळाली आहे. मागील 12 वर्षांत एकूण गुंतवणुकीच्या चारपटीहून अधिक संपत्ती निर्माण झाली आहे. भांडवली बाजार हा एक संपत्ती निर्माण करण्याचा चांगला मार्ग आहे. त्यामध्ये असणारा जोखीम समजावून घ्या. आपले आर्थिक नियोजन करा अन् मगच चांगल्या सल्लागारमार्फत गुंतवणूक करा. मार्केटमध्ये तेजी-मंदी हे चालत असणार; पण मंदीमध्ये जास्त युनिट करणे हे कधीही स्मार्ट निर्णय होऊ शकतो म्हणून तुम्ही जर एसआयपी करणार असाल, तर स्मार्ट एसआयपी करा आणि एक श्रीमंतीचा मार्ग अवलंब करा.
(लेखक एस पी वेल्थ, कोल्हापूरचे प्रवर्तक आहेत.)

अनिल पाटील 

SCROLL FOR NEXT