Latest

Golden Ram Temple : राम मंदिराची सर्वात सूक्ष्म सुवर्ण प्रतिकृती

Arun Patil

उदयपूर : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदिरात Golden Ram Temple रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त मंदिराच्या अनेक प्रकारच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या. त्यामध्ये हिरेजडित मंदिराच्या नेकलेसचाही समावेश होता. लाकडी तसेच पाषाणातून बनवण्यात आलेल्या प्रतिकृतींना अयोध्येत व अन्यत्रही मोठीच मागणी वाढली होती. आता राजस्थानमधील एका कलाकाराने राम मंदिराची सोन्यापासून राम मंदिरा सर्वात सूक्ष्म प्रतिकृती बनवली आहे.

उदयपूरच्या पीयूष प्रतापसिंह यांनी हे सर्वात सूक्ष्म राम मंदिर बनवले आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त Golden Ram Temple आपणही काहीतरी करावे, असे त्यांना वाटत होते. त्यांनी मंदिराचे मॉडेल पाहिल्यावर त्यांना सर्वात सूक्ष्म राम मंदिर मॉडेल बनवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी 28 दिवस मेहनत घेऊन सोन्याचे हे सूक्ष्म मंदिर तयार केले. ते गव्हाच्या दाण्याइतके लहान असून, त्याचे वजन अवघे 0.0200 मिलीग्रॅम इतके आहे. यानिमित्ताने आपण विश्वविक्रम केला असल्याचा दावाही त्यांनी केला असून, त्याची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये व्हावी यासाठी ते अर्ज करणार आहेत. हे सोन्याचे सूक्ष्म राम मंदिर बोटाच्या नखावरही सहज सामावते इतके छोटे आहे. त्याचे तपशील पाहण्यासाठी भिंगाची गरज भासते.

SCROLL FOR NEXT