Latest

पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; पाच कामगारांचा मृत्यू

Arun Patil

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : येरवड्यातील शास्त्रीनगर येथे इमारतीचा स्लॅबची लोखंडी गजाची जाळी कोसळून झालेल्या अपघातात पाच कामगारांचा मृत्यू झाला. तर अन्य काही कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची दाहकता पाहून मृतांचा आकडा वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

ही घटना गुरूवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यला सुरुवात केली.

शास्त्रीनगर चौक वाडीया बंगला गेट क्रमांक आठ येथे नवीन इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू होते. त्यावेळी स्लॅबची लोखंडी गजाची जाळी अचानक कोसळली. त्यावेळी तेथे काम करणारे कामगार वजनदार लोखंडी जाळीखाली अडकले. अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशनम दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

कटरच्या साह्याने अडकलेल्या कामगारांना बाहेर काढून उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार अकरा वाजून ४० मिनिटांनी घडल्याचे यावेळी सांगण्यात आले. जाळीमध्ये काही कामगार अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली. या ठिकाणी रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होते. हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण समजू शकले नाही.

SCROLL FOR NEXT