Latest

Thug Life : कमल हासन यांचा नवा लूक व्हायरल, अभिनेता सिलंबरासन टीआरसोबत ॲक्शन तडका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन आपली मागील रिलीज चित्रपट 'विक्रम' मधून धुमाकूळ घातल्यानंतर आपला अपकमिंग ॲक्शन ड्रामा चित्रपट 'ठग लाईफ' मुळे चर्चेत आहे. या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम करत आहेत. (Thug Life) चित्रपटामध्ये कमल हासन यांच्यासह ७ स्टार आहेत आणि आठव्या स्टारची एन्ट्री झाली आहे. आज ८ मे रोजी साऊथ स्टार सिलंबरासन टीआर यांची ठग लाईफमध्ये एन्ट्री झाली आहे. चित्रपट निर्मात्यांनी सिलंबरासन टीआरचा नवा ॲक्शन रॅक्ड फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोबत एक ॲक्शन पॅक्ड टीझरदेखील रिलीज झाला आहे. (Thug Life)

साऊथ स्टार सिलंबरासन टीआरच्या फर्स्ट लूकबद्दल झालायचे झाल्यास तो कारमध्ये गॉगल घालून बसलेला दिसतो. त्याच्या हातात गन आहे. टीजरमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशा प्रकारे त्याने कारमध्ये स्टंट करून स्वत: ला ग्लोरिफाय केलं आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णन, जयम रवि, ऐश्वर्या लक्ष्मी, गौतम कार्तिक, जोजू जियॉर्ज, कमल हासन, दुलकर सलमानची आधीच एन्ट्री झाली आहे.

ठग लाईफ कमल यांच्या करिअरचा २३४ वा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२४ मध्ये सुरु झाले आहे. सध्या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केलेली नाही. पण मल्टी स्टारर या चित्रपटामध्ये मणिरत्नम मोठा धमाका करणार आहे. मणिरत्नमने याआधी पोन्नियन सेलवन पार्ट १ आणि २ मधून धुमाकूळ घातला होता. यामध्ये विक्रम, जयम रवि, कार्ती, ऐश्वर्या राया, शोभिता धुलिपाला, तृषा कृष्णनने मुख्य भूमिका साकारली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT