Latest

Yodha : जबरदस्त ॲक्शन अवतारात दिसणार सिद्धार्थ मल्होत्रा, ट्रेलर यादिवशी येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्राचा नवा चित्रपट योद्धा (Yodha) १५ मार्चला रिलीज होणार आहे. दरम्यान, चित्रपट निर्मात्यांनी योद्धाचे पोस्टर्स आणि टीजर रिलीज केले होते. याशिवाय या चित्रपटातील पहिले गाणे देखील रिलीज करण्यात आले होते. प्रेक्षकांना 'योद्धा'चा टीजर आणि गाणं 'जिंदगी तेरे नाम' खूप आवडलं. आता आज निर्मात्यांनी घोषणा केली आहे की, या चित्रपाटचा ट्रेलर ४ दिवसानंतर रिलीज होईल. (Yodha)

सिद्धार्थ मल्होत्राने स्वत: सोशल मीडिया अकाऊंटवर योद्धा पोस्टर शेअर केले आहे. त्यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर २९ फेब्रुवारी रोजी रिलीज होईल. सिद्धार्थ मल्होत्राने चित्रपट योद्धाचे पोस्टर शेअर करत लिहिले, 'आसमान में परेशानियों के बीच योद्धा एक्शन करने के लिए तैयार है। फिल्म योद्धा का ट्रेलर 29 मार्च के दिन दर्शकों के सामने आएगा।' सिद्धार्थ मल्होत्रा रफ-एंड-टफ रोल्स मध्ये दिसेल.

SCROLL FOR NEXT