Latest

सिद्धरामय्या यांची ‘त्या अशुभ’ दरवाजातून कार्यालयात एंट्री!

मोहन कारंडे

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 'अशुभ' मानल्या जाणार्‍या दक्षिण दरवाजातून आपल्या कार्यालयात प्रवेश करीत सर्वांना आश्चर्यचकित केले. कथित वास्तुदोषामुळे विधानसौधमधील मुख्यमंत्री कार्यालयाचा हा दरवाजा अनेक वर्षांपासून बंद ठेवण्यात आला होता. एकाही मुख्यमंत्र्यांनी ते उघडण्याचे साहस केले नव्हते.

अधिकार्‍यांसोबतच्या एका बैठकीनिमित्त सिद्धरामय्या शनिवारी विधानसौधमध्ये आले होते. त्यांचे लक्ष या दरवाजाकडे गेल्यानंतर त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली. हा दरवाजा अशुभ असल्याने तो उघडला जात नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी त्या दरवाजापुढे उभे राहातच तो उघडण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. आता या दरवाजातूनच आपल्या कार्यालयात ये-जा करण्याचा निर्णय सिद्धरामय्या यांनी घेतला आहे.दरम्यान, हा अशुभ दरवाजा उघडल्यास आपली राजकीय कारकीर्द संकटात येईल, या भीतीमुळे यापूर्वी एकाही मुख्यमंत्र्याने तो उघडण्याचा किंवा त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला नाही, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली.

SCROLL FOR NEXT